Marathi News> भारत
Advertisement

सुरु होता 'पार्टनर स्वॅपिंग'चा घृणास्पद खेळ, पोलिसांनी केला पर्दाफाश

धक्कादायक म्हणजे यात तब्बल हजार जोडप्यांचा सहभाग होता

सुरु होता 'पार्टनर स्वॅपिंग'चा घृणास्पद खेळ, पोलिसांनी केला पर्दाफाश

Partner Swapping Racket : पत्नीची अदलाबदल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमधील (Kerala) कोट्टायमजवळील (Kottayam) करुकाचल इथं पत्नींच्या अदलाबदलीप्रकरणी (partner swapping racket) पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून पत्नी बदलण्याचा घृणास्पद खेळ सुरु होता. यात तब्बल एक हजाराहून अधिक सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी सांगितले की, एका महिलेने तक्रार दाखल केली होती, पतीने जबरदस्तीने तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले होते आणि तो तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत असे संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.

असा झाला पर्दाफाश
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.  महिलेचा पती पत्नीवर इतर लोकांशी संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपीच्या सततच्या  त्रासाल कंटाळून या महिलेने करुकच पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह त्याच्या सात मित्रांना अटक केली आहे.

कपल शेअरींग ग्रुप
पीडित महिलेचा पती कपल शेअरिंग ग्रुपचा (Couple sharing group) सदस्य आहे. या ग्रुपचे सदस्य टेलिग्राम, मेसेंजर अॅप आदींचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपींना कोट्टायम, अलप्पुझा आणि एर्नाकुलम जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे केरळमधील विविध भागातील 1000 हून अधिक जोडपी या कपल शेअरिंग ग्रुपचे सदस्य आहेत. यामध्ये अनेक उच्चभ्रू सोसायटीतल जोडप्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Read More