Marathi News> भारत
Advertisement

जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा

जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.

जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा

नवी दिल्ली : जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.

दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारनं या रुग्णालयावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला फायनान्स कमिशनरांनी स्थगिती दिलीय.

हॉस्पीटलकडून जिवंत बालकाला मृत घोषित करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर दिल्ली सरकारनं यासंबंधी चौकशी समिती नेमली होती. समितीच्या चौकशीत हॉस्पीटल दोषी आढळल्यानं दिल्ली सरकारनं हॉस्पीटलचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते... 

दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हे प्रकरण कोर्ट ऑफ फायनान्स कमिशनरांकडे पाठवलं होतं. त्यानंतर आता दिल्ली सरकारच्या आदेशांना स्थगिती मिळालीय. 

काय होतं प्रकरण...

३० नोव्हेंबर रोजी या चिमुरड्याचा जन्म झाला होता. या चिमुरड्याच्या आईनं एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन जुळ्यांना जन्म दिला होता... ही दोन्हीही मुलं मृत जन्माला आल्याचं सांगत रुग्णालयानं एका प्लास्टिकच्या पिशवीत दोन्ही अर्भकांना भरून त्यांच्या पालकांच्या हाती सोपवलं होतं. यावेळी रुग्णालयानं बाळाचा ईसीजी काढला नव्हता... त्यामुळे बालकाचा मृत्यू झाला किंवा नाही, हे स्पष्ट झालेलं नसतानाही बालक मृत घोषित करण्यात आलं.  

पिशवीत एका बालकाची हालचाल जाणवल्यानंतर आई-वडिलांना आपला मुलगा जिवंत असल्याचं समजलं होतं. या बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, मंगळवारी सायंकाळी पीतमपुरा भागातील एका रुग्णालयात या बाळानं अखेरचा श्वास घेतला.  

Read More