Marathi News> भारत
Advertisement

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळं तुमचा प्रवास सोप्पा व आरामदायी होईल.   

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: 10 मेपासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचे चारही धाम म्हणजेच चार मंदिरे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार भाविकांसाठी खुले झाले आहेत. हिंदू धर्मात चार धाम यात्रा खूप महत्त्वपूर्ण तीर्थयात्रेपैकी एक आहे. जवळपास सहा महिने चार धाम यात्रा सुरू असते. या सहा महिन्यात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. याला छोटी चार धाम यात्रा असंही म्हणतात. आदी शंकराचार्य यांनी देशातील चार कोपऱ्यात चार पवित्र तीर्थस्थळ स्थापित केले आहेत. त्या तीर्थस्थळांचे दर्शन म्हणजेच चारधाम यात्रा. देशातील चार कोपऱ्यात चार धाम आहेत. ते म्हणजे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ, गुजरातमध्ये द्वारका, उडीसामध्ये पुरी आणि तामिळनाडुमध्ये रामेश्वरम. उत्तराखंड येथील चार धाम यात्रेसाठी एकतर पायी किंवा घोडे किंवा खच्चरच्या मदतीने दर्शनासाठी जावे लागते. तर, काही भाविक हेलिकॉप्टरने चार धाम यात्रा पूर्ण करतात. 

चार धाम यात्रेला प्राचीन इतिहास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मात्र चार धाम यात्रेला निघण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. या माहिती अभावी तुमची चार धाम यात्रा सुरू करु शकणार नाहीत. चार धाम यात्रेचे रजिस्ट्रेशन, चार धाम यात्रा कधी सुरू करावी, यासारथ्या अनेक प्रश्नांची आज उत्तरे जाणून घेऊया. 

चार धाम यात्रेसाठी रजिस्ट्रेशन कसं करालं?

चार धाम यात्रेसाठी निघणाऱ्या सर्व भाविकांना बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. भाविक ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करु शकतात. त्याचबरोबर, उत्तराखंड पर्यटन विकास परिषद (UTDV) कडून रजिस्ट्रेशनसाठी टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबरदेखील जारी करण्यात आले आहेत. तिथून रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान प्रमाणपत्र, पासपोर्टच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करु शकता. 

चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी कोणत्या वस्तुसोबत घेऊन जाल? 

चार धाम यात्रा ही खूप कठिण मानली जाते. कारण की इथले रस्ते धोकादायक आहेत. त्याचबरोबर उंच डोंगर आणि घनदाट जंगलातून वाट काढावी लागते. कारण एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानाकडे जाण्यासाठी अवघड वाट पार करावी लागते. त्यामुळं लक्षात ठेवा की तुम्ही शारिरीकदृष्ट्या पूर्णपणे फिट आहात. प्रवास सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करुन घ्याल. तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तरच प्रवासाला जा. तसंच, प्रवासात मेडिकल किट, शरीराला उर्जा देणारे पदार्थ, खाण्याचे सामान हे सर्वकाही सोबत घेऊन जा. 

रोख, रक्कम, आयडी कार्ड, गरम कपडे, रेनकोड-छत्रे, ट्रेकिंग स्टिक, ड्राय फ्रुट्स आणि स्नॅक्स, थर्मल बॉटल, पर्सनल हायजीनचे सामान जसं की टुथब्रश, शॅम्पू, सॅनिटायझर, मॉइश्चरायजर या वस्तू आठवणीने सोबत घेऊन जा. 

प्रवास सुरू करण्याआधी ही काळजी घ्या

चार धाम यात्रा कठिण यात्रा आहे. हरिद्वार येथून गंगा स्नान करुनच चारधाम यात्रेला सुरुवात होते. चारही धामांना भेट देण्यासाठी एकूण 10 दिवस तरी लागतात. त्यामुळं इतके दिवस तुम्ही बाहेर असाल काय काळजी घ्यावी, हे तुमच्या लक्षात असायला हवं. चार धाम यात्रेपैकी दोन मंदिरांपर्यंत जाण्याचा मार्ग अवघड आहे. केदारनाथ आणि यमुनोत्री येथील प्रवास अवघड आहे. तर, त्या तुलनेत बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडील प्रवास थोडा सोप्पा आहे. 

चार धाम यात्रेला गेल्यानंतर जर तुम्हाला पायी ट्रेक करायचा नसेल तर तुम्ही घोडा किंवा खच्चर, पालखीदेखील घेऊ शकता. मात्र, रजिस्टर्ट लोकांकडून घोडा किंवा खच्चर घ्या. कारण त्यांचे रेट फिक्स असतात. 

चार धाम यात्रेला निघताना शरीर हायड्रेटड ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी दोन लीटर पाणी प्या. त्याबरोबरच, शरीरात न्युट्रिएंट्सची कमतरता भासू देऊ नका त्यामुळं फलाहार घ्या. 

डोंगर चढताना नेहमी नाकाने दीर्घ श्वास घ्या. त्यामुळं फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही लवकर थकणारदेखील नाही. 

चार धाम यात्रेच्या दरम्यान फास्ट फुड, जंक फुड, शुगर ड्रिंक्स, कॉफी, सिगरेट अजिबात घेऊ नका. त्याचबरोबर जास्त तळलेले व मसालेदार जेवण खाऊ नये. 

चार धाम यात्रेला कोणी जाऊ नये?

55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लोक ज्यांना हृदयविकार, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आहे त्यांनी चारधाम यात्रेला जाताना काळजी घ्यावी. तसंच, गर्भवती महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हेल्थ चेकअप करुनच चार धाम यात्रेला जावे. 

Read More