Marathi News> भारत
Advertisement

...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या, करणी सेनेचा खळबळजनक दावा

 या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय. 

...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या, करणी सेनेचा खळबळजनक दावा

मुंबई : हायप्रोफाईल अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्याकडे नर्मदा नदीच्या एका मोठ्या वाळू घोटाळ्याचे काही महत्त्वाची कागदपत्रं होती... यामुळे त्यांच्यावर सरकारचा दबाव वाढत होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं केलाय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय. 

नर्मदा नदीच्या वाळू घोटाळ्याची महत्त्वाची कागदपत्रं भय्यू महाराज यांच्याकडे होती, अशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर सूत्रांकडून मिळतेय, असं यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी म्हटलंय. 

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ गोगामेडी यांनी मीडियासमोर कुठलेही पुरावे मांडणं टाळलं. जर सरकार प्रामाणिक असेल तर भय्यू महाराज यांच्या मृत्यूविषयी सीबीआय चौकशी करण्याचे तत्काळ आदेश देईल, असं गोगामेडी यांनी म्हटलंय. सरकारनं चौकशीचे आदेश दिले नाहीत तर करणी सेना आंदोलन करेल, असा इशाराही त्यानी यावेळी दिलाय. 

भय्यू महाराज सोमवारी इंदोरहून महाराष्ट्राकडे येण्यासाठी निघाले होते. ते सेंधवापर्यंत आलेही होते. पण, प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर ७ वेळा कॉल आला. कॉल येताच महाराजांनी गाडीतील लोकांना खाली उतरवले आणि गाडीत बसून एकट्यानेच संवाद केला. मोबाईलचे बोलने संपताच त्यांनी सेंधवातूनच गाढी परत फिरवली आणि ते इंदोरला परतले... आणि इथंच त्यांनी मंगळवारी आत्महत्या केली. १२ जून रोजी 'मी तणावातून आत्महत्या केलेली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही', असं भय्यू महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.  

Read More