Marathi News> भारत
Advertisement

बंडखोर १४ आमदार अपात्र, उद्या येडीयुरप्पांचा विश्वासदर्शक ठराव

 १४ आमदार अपात्र ठरल्यामुळे विधानसभेची सदस्यसंख्या आता अध्यक्षांसह २०८ वर 

बंडखोर १४ आमदार अपात्र, उद्या येडीयुरप्पांचा विश्वासदर्शक ठराव

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत बंड करणारे काँग्रेस, जेडीएसच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. येडीयुरप्पा उद्या विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. त्याला सर्व आमदारांनी उपस्थित राहावं असं आवाहन रमेशकुमार यांनी केलंय. १४ आमदार अपात्र ठरल्यामुळे विधानसभेची सदस्यसंख्या आता अध्यक्षांसह २०८ वर आलीय. याचा फायदा भाजपालाच होणार अशी चिन्हं आहेत.

उद्या विश्वासदर्शक प्रस्ताव

विधानसभेत उद्या येडीयुरप्पा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडतील तेव्हा २०७ सदस्य मतदान करतील. ठराव संमत करण्यासाठी १०४ मतांची भाजपाला गरज आहे. भाजपाकडे सध्या १०५ अधिक एक अशी मतं आहेत. तर काँग्रेसकडे ६६ आणि जेडीएसकडे ३४. बसपाचा एक सदस्य आहे. 

Read More