Marathi News> भारत
Advertisement

मंदिरात माथा टेकला, मस्जिदमध्ये चादर चढवली, चर्चमध्ये प्रार्थनाही केली

कर्नाटक निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकच्या आपल्या तिसऱ्या दौऱ्यावर निघालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं मंदिर दर्शन पुढेही सुरूच ठेवलंय. 

मंदिरात माथा टेकला, मस्जिदमध्ये चादर चढवली, चर्चमध्ये प्रार्थनाही केली

मंगळुरू : कर्नाटक निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकच्या आपल्या तिसऱ्या दौऱ्यावर निघालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं मंदिर दर्शन पुढेही सुरूच ठेवलंय. 

दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी उडपी, दक्षिण कन्नड, चिकमंगलूर आणि हासन या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यावेळी राहुल गांधींनी मंदिरचं नाही तर मस्जिद आणि चर्चमध्ये जाऊनही प्रार्थना केली. त्यांनी एका स्थानिक दर्ग्यात जाऊन चादरही चढवली... आणि चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थनाही केली. या दरम्यान त्यांनी एका जाहीर सभेत केंद्र सरकारवर हल्लाबोलही चढवला.

मंगळवारी कर्नाटकच्या तिसऱ्या दौऱ्याची सुरुवात राहुल गांधींनी कर्नाटकच्या उडपीपासून केली. दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी नारायण गुरू मंदिरात दर्शन घेतलं. त्यांच्या सोबतच कर्नाटकचे मुख्यमत्री सिद्धरामय्या हेदेखील उपस्थित होते. त्यांनी राजीव गांधी पॉलिटिकल इन्स्टिट्युटचं उद्घाटनंही केलं. 

fallbacks

उडपीनंतर राहुल गांधी मंगळुरूच्या कुद्रोलीतल्या गोकर्णनाथेश्वर मंदिरात गेले आणि पूजा-अर्चाही केली. यानंतर ते रोसारियो कॅथेड्रल गेले. इथं त्यांनी एका विशेष प्रार्थनासभेत सहभाग घेतला. यावेळीही त्यांच्यासोबत मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे होते.  

Read More