Marathi News> भारत
Advertisement

राज्यसभेत कपिल देवची नवी इनिंग? गांगुलीला भाजपमध्ये आणण्याची तयारी

भाजपने 'समर्थनसाठी संपर्क अभियान' सुरु केलेय. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी १ जून रोजी कपिल देवची  भेट घेतली होती.

राज्यसभेत कपिल देवची नवी इनिंग? गांगुलीला भाजपमध्ये आणण्याची तयारी

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव याची नवी इनिंग राज्यसभेतून होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कपिल देव याची त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे कपिलला राज्यसभा सदस्य बनविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे  'समर्थनसाठी संपर्क अभियान' सुरु आहे. त्यानुसार १ जून रोजी कपिल देवची भेट शाह यांनी घेतली होती. तर दुसरीकडे माजी कर्णधार सौरभ गांगुली याला भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तर कपिल प्रस्ताव नाकारणा नाही!

सूत्रांच्या माहितीनुसार अशी शक्यता वर्तविली जात आहे की, राज्यसभा सदस्य निवडीबाबत यादी तयार करण्यात येत आहे. या यादीत कपिल देव यांचे नाव, असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्यांच्या नावाची शिफारस केली तर कपिल देव हा प्रस्ताव नाकारणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे कपिल देवची नवी इनिंग राज्यसभेतून होण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यसभेतील सात जागा रिक्त  

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या एका अहवालाप्रमाणे राजकीय पक्षांनी कपिल देव यांना राजकारणात येण्याचे आधीच आमंत्रण दिले आहे, परंतु त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय कायम ठेवला. भारतीय जनता पार्टी आणि पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाने कपिल देव यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. पण यावेळी, ते राज्यसभेचे सभासद होण्याची राष्ट्रपतींची ऑफर नाकारणार नाहीत. ज्यांनी आपल्या क्षेत्राच चांगले योगदान दिलेय. त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती करु शकतात. त्यामुळे कपिल देव यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. राज्यसभेतील १२ पैकी सात जागा अजूनही रिक्त आहेत.

गांगुला भाजपमध्ये दाखल ?

दरम्यान, माजी कर्णधार सौरव गांगुली भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबत सोशल मीडियावर याचे वृत्त जोरदार व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आपली पक्कड मजबूत करण्यासाठी सौरभ गांगुलाला पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, गांगुलीबाबत जे काही वृत्त येत आहे, त्याबाबत गांगुलीने इन्कार किंवा खंडन केलेले नाही.

Read More