Marathi News> भारत
Advertisement

मुलगी शेजाऱ्यांकडे गेली म्हणून या क्रूर बापाने तिला धकधकत्या उन्हात खांबाला बांधले आणि नंतर.....

एका 9 वर्षाच्या मुलीला उन्हात तापलेल्या सौर खांबावर बांधून ठेवले होते सुमार 2 तास तिला असेच उन्हात उभे रहावे लागले.

मुलगी शेजाऱ्यांकडे गेली म्हणून या क्रूर बापाने तिला धकधकत्या उन्हात खांबाला बांधले आणि नंतर.....

कानपूर : यूपीच्या कानपूर ग्रामीण भागातून अत्यंत वाईट आणि क्रूर गोष्ट समोर आली आहे. एका 9 वर्षाच्या मुलीला उन्हात तापलेल्या सौर खांबावर बांधून ठेवले होते सुमार 2 तास तिला असेच उन्हात उभे रहावे लागले, याचा तिला खूप त्रास झाला. हे कृत्यू ज्या व्यक्तीने केले हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण हे कृत्य करणारा व्यक्ती ही त्यामुलीचा बाप आहे.

खरेतरं कोणतेही आईवडील आपल्या मुलांना जगात सगळ्यात जास्त प्रेम करतात आणि आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतात. त्यामुळे कोणतेही वडील इतकं वाईट कृत्य आपल्या लहान मुलीसोबत करतील यावर विश्वास ठेवणे तसे अवघडच आहे, परंतु हे खरं आहे. ती 9 वर्षाची मुलगी कडक उन्हात तापत होती, रडत होती, तिला खूप वेतना होत होत्या. ती आई-बाबा म्हणून रडू लागली. मला वाचवा म्हणून मदत मागू लागली परंतु लोकं या घटनेत काही करु शकत नव्हते, परंतु त्यांनी हे दृश्य फोटो आणि व्हीडिओच्या मार्फत टीपले.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. वडिलांचे हे निर्दय कृत्य पाहून शेजारी देखील दंग झाले. मुलीची आई नाही आहे ती तिच्या वडील आणि भावासोबत राहते.

न विचारता शेजाऱ्यांच्या घरी गेल्याने शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या आईचे सुमारे 5 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी वडीलांवर आहे. शनिवारी वडील कामासाठी घराबाहेर पडले होते. जाताना त्याने आपल्या मुलीला भावाजवळ थांबायला सांगितले होते. परंतु ती मुलगी भावाला घरी एकट्याला टाकून बाहेर शेजाऱ्यांकडे निघून गेली. वडील जेव्हा काम संपवून घरी आले, तेव्हा त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यानंतर वडीलांचा त्यांच्या रागावर ताबा उरला नाही, तो घराच्या गेटजवळ मुलगी घरी परत यायची वाट पाहत बसला.

मुलगी शेजारच्यांच्या घराबाहेर पडलेली, त्याने पाहिले तसेच आपल्या मुलीला मारहाण करायला सुरवात केली. आजूबाजूच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वडीलांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि शेजार्‍यांशी देखील भांडण केले. मुलगी चूक झाली म्हणून वडीलांकडे माफी मागत होती, परंतु त्या निर्दयी बापाला आपल्या रागासमोर काही दिसले नाही. तो आपल्या मुलीला खेचत घरच्या गच्चीवर घेऊन गेला आणि तिला प्रखर उन्हात सौर खांबावर बांधले.

पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले

मुलगी धकधकत्या प्रखर उन्हात सुमारे 2 तास मदतीसाठी याचना करत राहिली. रडत असताना ती आजी आणि आईची आठवण काढत मला वाचवा खूप त्रास होतोय असे म्हणू लागली. तेव्हा शेजार्‍यांनी घटनेचा व्हीडिओ बनवून व्हायरल केला. व्हीडिओ समोर आल्यानंतर भाऊपूर पोलिस गावात पोहोचले आणि त्यांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. संपूर्ण प्रकरणाचा तपास त्यांनी आता सुरु केला आहे.

Read More