Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा Video

Kanhaiya Kumar Video : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला (slapped during election campaign) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.

काँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा Video

Kanhaiya Kumar slapped during election campaign : दिल्लीत लोकसभा निवडणूक प्रचार आता जोर धरू लागला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेस अशी लढत पहायला मिळतेय. अशातच आता ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) देखील व्हायरल होतोय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्हैया कुमारला पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने कन्हैयाजवळ आला अन् हार घातल्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. यावेळी कन्हैया कुमारवर देखील शाई फेकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्लीतील ब्रह्मपुरी भागात ही घटना घडली. कन्हैया कुमारची शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या उस्मानपूर कार्यालयात बैठक झाली. बैठक संपल्यानंतर लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. त्यावेळी हार घालण्याच्या बहाण्याने कन्हैयावर हल्ला केला गेला. त्यावेळी त्याच्यावर शाईफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कन्हैयाच्या कानशिलात मारल्यावर समर्थकांनी हल्लेखोराला पकडलं अन् बेदम मारहाण केली. 

पाहा Video

काँग्रेसने ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघामधून कन्हैया कुमारला उमेदवारी दिली आहे. मागील वर्षी कन्हैयाने काँग्रेसचा हात पकडला होता. विद्यार्थी चळवळीत उभं राहिलेलं नेतृत्व म्हणून कन्हैयाकडे पाहिलं जातं. 20 दिवस तिहार तुरुंगात जाऊन आल्यानंतर कन्हैया कुमार देशभरात चर्चेत आला होता. तरुणांचा बुलंद आवाज म्हणून कन्हैयाची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळेच काँग्रेसने दिल्लीत पक्षाला उतरती कळा लागली असताना दिल्लीतून उमेदवारी दिली अन् कन्हैयाला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं.

कन्हैयाचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं? ते फक्त बोलत आहेत. पण करत काहीच नाही. त्यांनी देशासाठी काहीही केलेलं नाही. ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी गेल्या 10 वर्षांत काहीही केलेलं नाही, असं म्हणत कन्हैया यांनी दिल्लीत जोरदार प्रचारसभा गाजवली. 

Read More