Marathi News> भारत
Advertisement

तुमचा पैसा दुप्पट करण्याच्या सोप्या टीप्स...

उतारवयात किंवा गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून... 

तुमचा पैसा दुप्पट करण्याच्या सोप्या टीप्स...

मुंबई : पैसा वाचवणं म्हणजेच पैसा कमावणं, ही म्हण तर तुम्ही जाणत्या लोकांकडून ऐकली असेलच... पण, फक्त पैसा वाचवून उपयोग नाही... हा वाचवलेला पैसा योग्यरितीनं गुंतवला गेला तर त्याचा फायदा तुम्हाला अडीअडचणीच्या वेळी होतो. त्यामुळे उतारवयात किंवा गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची वेळ येत नाही. यासाठी तुम्हाला काही सोपे नियम अंमलात आणावे लागतील. 

चक्रवाढ व्याज

बचतीचा पैसा पुन्हा पुन्हा गुंतवणुकीत वळवा... तुम्हाला केवळ बचत निरंतर ठेवायचीय... बाकीचं काम चक्रवाढीवर सोपवा... दीर्घकाळात तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

समजा तुम्ही १०० रुपये गुंतवलेत त्यावर तुम्हाला १० टक्के व्याज मिळतंय. एक वर्षानंतर ११० रुपये मिळतील. पुढच्या वर्षात चक्रवाढ व्याजामुळे तुम्हाला ११० रुपयांवर १० टक्के व्याज मिळणार आहे... त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीत वाढ होऊन ती १२१ रुपयांवर पोहचेल. पुढच्या वर्षात पुन्हा तुम्हाला १२१ रुपयांवर १० टक्के व्याज मिळेल...

तुमचा पैसा दुप्पट कसा होईल हे जाणून घेण्यासाठीचा 'नियम ७२' प्रचलित आहे. नियम ७२ काय आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे जाणून घेऊयात.... 

'नियम ७२'चा फॉर्म्युला

जर तुम्ही १०० रुपयांची गुंतवणूक केली त्यावर तुम्हाला १० टक्के व्याज मिळतंय तर 'नियम ७२'नुसार, ही गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी ७२/१० = ७.२ वर्ष लागतील. जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली तर जवळपास सात वर्षांत ती दोन लाख रुपये होईल.

यासाठी तुम्हाला नोकरीला लागल्यानंतर किंवा २५ व्या वर्षापासून गुंतवणुकीची सवय लागायला हवी. व्यक्ती प्रत्येक वर्षाला १०,००० रुपयांची गुंतवणूक करतोय आणि त्याला १० टक्क्यांचं व्याज मिळतंय तर खालील टेबलद्वारे कमी वयापासून गुंतवणुकीचे फायदे समजून घ्या...

वय   रिटायरमेंट फंड

२० वर्ष - ४९ लाख रुपये
२५ वर्ष  - ३० लाख रुपये
३० वर्ष  - १८ लाख रुपये
३५ वर्ष  - ११ लाख रुपये
४० वर्ष  - ६ लाख रुपये

तुम्ही आत्तापर्यंत गुंतवणुकीला सुरुवात केलेली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही...

नियम ७२ चे फायदे

- तुमची गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होईल हे जाणून घेण्यासाठी नियम ७२ मदत करतो

- १० टक्के व्याज देणारे विकल्प तुम्हाची गुंतवणूक ७२/१० = ७.२ वर्षांत दुप्पट करतील

- २५ व्या वर्षापासून तुम्ही ५००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर ६० व्या वर्षात तुमच्याकडे एक करोड रुपयांहून अधिक रक्कम असेल

- ४९ लाख रुपये ६० व्या वर्षी मिळवण्यासाठी २० वर्षांची व्यक्ती वार्षिक १० हजार रुपायांची गुंतवणूक करतेय तर २५ वर्षांच्या व्यक्तीला हेच लक्ष्य प्राप्त करण्यासाठी वार्षिक १६,५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल

यासाठी लक्षात ठेवा, जसजशी तुमच्या मिळकतीत वाढ होईल तसतशी तुमच्या गुंतवणुकीतही वाढ व्हायला हवी...  

Read More