Marathi News> भारत
Advertisement

लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय. 

लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय. 

न्यायमूर्ती शिवपाल सिंह यांनी ६ जानेवारी रोजी लालू प्रसाद यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह आणि त्यांचा मुलगा-मुलीनं लायसन्ससाठी अर्ज केलाय. हा अर्ज प्रक्रियेत आहे. 

दरम्यान रांची जिल्हा बार असोसिएशननं गुरुवारी सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्या न्यायालयाची बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलाय. वकिलाच्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर एका वकिलानं रांची न्यायालयाकडे वेळ मागितला होता, आणि सिंह यांनी ही मागणी नाकारला होती... याच गोष्टीचा निषेध म्हणून त्यांच्या न्यायालयाचा बहिष्कार करण्यात येणार आहे. 

Read More