Marathi News> भारत
Advertisement

CJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी

न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत. 

CJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली : न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत. 

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुरू होती. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर आता न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी दीपक मिश्रा यांनी आपल्याकडे घेतलीय.

या प्रकरणात चीफ जस्टिस मिश्रांच्या या खंडपीठात न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड असतील. चीफ जस्टिस २२ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. 

लोया यांचा संशयास्पद मृत्यु

न्यायाधीश लोया यांचा मृत्यु १ डिसेंबर २०१४ मध्ये झाला होता. त्यावेळी न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीने प्रकरणाची सुनावणी करत होते. आणि या प्रकरणात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आरोपी होते. नंतर अमित शाह यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. लोया हे एका कार्यक्रमात गेले असताना त्यांच्या मृत्यु झाला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्युवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

Read More