Marathi News> भारत
Advertisement

'या' हुकूमशहाने केली सुभाष चंद्र बोस यांची हत्या- स्वामी

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, हा समज चुकीचा आहे.

'या' हुकूमशहाने केली सुभाष चंद्र बोस यांची हत्या- स्वामी

आगरतळा: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या हत्येत रशियन हुकूमशहा स्टॅलिन यांचा हात असल्याचे विधान भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते त्रिपुराच्या आगरतळा येथील सभेत बोलत होते. 

यावेळी स्वामी यांनी म्हटले की, १९४५ साली झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे. रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचा नेताजींची हत्या घडवून आणण्याच्या कटात सहभाग होता.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि जपानी राज्यकर्त्यांनी हा कट रचला. त्यावेळी नेताजींना रशियाने आश्रय दिला होता. नेहरूंना हे सर्व माहिती होते. त्याचठिकाणी बोस यांचा खून करण्यात आला, असे स्वामी यांनी सांगितले. 

साहजिकच स्वामी यांच्या या खळबळजनक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

Read More