Marathi News> भारत
Advertisement

बील न भरल्याने हॉस्पीटलने आईला ठेवलं ओलीस, नवजात बाळाला सोडलं घरी; वडिलांनी 'असा' वाचवला जीव

Hopsital Makes Mother Hostage: आईनं बाळाला दुधासाठी जवळ घेतलं आणि तिला धक्काच बसला. तिचं दूध आटलं होतं.

बील न भरल्याने हॉस्पीटलने आईला ठेवलं ओलीस, नवजात बाळाला सोडलं घरी; वडिलांनी 'असा' वाचवला जीव

Hopsital Makes Mother Hostage: अनेकदा आपल्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली असेल. काही वेळा पैशांचा बंदोबस्त होत नाही, अशावेळी आपण काही फी कमी करण्याची विनंती करतो. रुग्णालयांकडून अनेकदा विनंती मान्यदेखील होते. दरम्यान एका रुग्णालयात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. खासगी रुग्णालयाचे बील न भरु शकल्याने त्यांनी नवजात बाळाला घरी सोडलं आणि बाळाच्या आईवा रुग्णालयातच ओलीस ठेवले. ही घटना समोर आल्यापासून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. 

दुध पित्या बाळाला त्याच्या आईपासून दूर करण्याची मोठी चूक रुग्णालयाने केली. नियमांच्या नावाखाली खासगी रुग्णालयाला माणुसकीचा विसर पडल्याचे दिसून आले. नवजात बाळासाठी दूध हे अमृतासमान असते. असे असताना त्याला दूध पिण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे त्याच्या मानवी हक्कांचे हनन आहे. यामुळे तब्बल 21 दिवस बाळाचे संगोपन बकरीचे दूध देऊन करावे लागले. मीडियामध्ये हे वृत्त समोर आल्यानंतर रुग्णालयाचा भांडोफोड झाला. यानंतर रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांचा संताप अनावर झाला. हे प्रकरण हायकोर्टात गेले आणि त्यांना यात हस्तक्षेप करावा लागला. 

बील न भरल्याने जेनेटिक रुग्णालयाने आईला बाळापासून दूर करण्याचा लाजीरवाणा प्रकार केला. यानंतर कोर्टाने रुग्णालयाला नोटीस जारी केली. यासंदर्भात चौकशी करुन रिपोर्ट देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. 

पोलिसांनी केली आईची सुटका 

पीडितेच्या ऑपरेशनचे 4 लाख इतके बील झाले होते. त्यांनी जमिन विकून 2 लाख रुपये गोळा केले. पण शिल्लक रक्कम देण्यास त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्यांनी रुग्णालयाला त्यासंदर्भात कळवले. पण रुग्णालयाने बाळाला घरी सोडले आणि आईला ओलीस ठेवले. हे वृत्त मिळताच 27 जून रोजी महिलेची रुग्णालयातून सुटका केली. 

आटलं आईचं दूध 

पीडित मातेची सुटका झाल्यानंतर ती तिच्या घरी गेली आणि बाळाला बिलगली. बाळदेखील आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होतं. दरम्यान आईनं बाळाला दुधासाठी जवळ घेतलं आणि तिला धक्काच बसला. तिचं दूध आटलं होतं. तिची कहाणी आता सोशल मीडियात व्हायरल होतेय.

Read More