Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटकातील राजकीय 'नाटकात' कुमारस्वामींची पत्नी चर्चेचा विषय

राधिकाशी केलेल्या विवाहामुळे कुमारस्वामींना कायदेशीर लढाईही लढावी लागली. 'हिंदू पर्सनल लॉ' कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता

कर्नाटकातील राजकीय 'नाटकात' कुमारस्वामींची पत्नी चर्चेचा विषय

बंगळुरू :  कर्नाटकातील जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी सध्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहेत... परंतु सोबतच ते त्यांच्या खाजगी जीवनामुळेही चर्चेत आहेत. कुमारस्वामींच्या राधिकासोबत विवाहाच्या बातम्या जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा त्यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता. २०१६ साली अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या राम्या यांनी या गुप्त विवाहाचा आणि त्यांना एक मुलगीही असल्याचं उघड केलं होतं. कुमारस्वामी आणि राधिका दोघांचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कुमारस्वामी यांनी अनिता यांच्यासोबत विवाह केला होता. कुमारस्वामी-अनिता यांना निखिल नावाचा एक मुलगाही आहे... तर राधिका २००२ पर्यंत रतन कुमार यांच्यासोबत नात्यात होती... त्यांचा विवाह केवळ दोन वर्ष टिकला. देवेगौडा कुटुंबीयांकडून मात्र या विवाहावर मौन पाळण्यात आलं.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये कुमारस्वामी यांनी राधिकासोबत विवाह केला होता. या दोघांना शमिका कुमारस्वामी नावाची एक मुलगीही आहे.

राधिकाशी केलेल्या विवाहामुळे कुमारस्वामींना कायदेशीर लढाईही लढावी लागली. 'हिंदू पर्सनल लॉ' कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. परंतु, साक्षीदार नसल्यानं हा खटला फेटाळण्यात आला

राधिका एक कन्नड अभिनेत्री आहे. नववीत असताना तिनं सिनेमांत काम सुरू केलं... २००२ साली 'नीला मेघा शामा' नावाच्या कन्नड सिनेमात तिनं पहिल्यांदा काम केलं. २००५ साली ती कुमारस्वामींच्या संपर्कात आली आणि मग तिचं करिअरही हीट झालं.

Read More