Marathi News> भारत
Advertisement

अल्लाउद्दीन खिलजीला पाहून आजम खान आठवतात-जयाप्रदा

उत्तर प्रदेशमधील रामपुरच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टी (सपा) चे वरिष्ठ नेता आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केले.

अल्लाउद्दीन खिलजीला पाहून आजम खान आठवतात-जयाप्रदा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील रामपुरच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टी (सपा) चे वरिष्ठ नेता आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केले.

जयाप्रदा यांनी आजम खान यांची तुलना अलाउद्दीन खिलजीशी केली. 

जेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहत होती तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला पाहून माझ्या समोर आजम खान यांचा चेहरा यायचा.

मी निवडणुक लढवत असताना मला त्या व्यक्तीने कशाप्रकारे त्रास दिला याचाच मी विचार करत होती. असे जयाप्रदा यांनी सांगितले.  न्यूज एजन्सी एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलेयं. 

अखिलेश बिघडलाय 

 काही दिवसांपूर्वी जयाप्रदा यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना बिघडलेला मुलगा असे संबोधले होते.

अखिलेश बिघडलेला मुलगा आहे. त्याने भगवान रामपासून शिकायला हवे. जो वडिलांचे वचन निभावण्यासाठी राज दरबार त्यागून वनवासाला गेला. 

जयाप्रदा जिंकल्या 

मुलायम सिंह यादव यांचे मित्र राहिलेले अमर सिंह यांनी जयाप्रदा यांना राजकारणात आणले. जयाप्रदा यांनी आजम खान यांचा गड असलेल्या रामपुर येथून सपा च्या तिकिटावर निवडणुक जिंकली. 

हाकालपट्टी  

अखिलेश यादव सपाचा अध्यक्ष बनल्यानंतर अमर सिंह आणि जयाप्रदा यांना पार्टीतून काढण्यात आलं. जयाप्रदासोबत अभिनेत्री जया बच्चनही सपा मध्ये आल्या होत्या. पण त्या आजही पार्टीमध्ये आहेत.

Read More