Marathi News> भारत
Advertisement

Bihar Election 2020 : निवडणुकीपूर्वी गोळीबार, उमेदवाराचा मृत्यू

धक्कादायक घटनेमुळं पुन्हा बिहार हादरलं 

Bihar Election 2020 : निवडणुकीपूर्वी गोळीबार, उमेदवाराचा मृत्यू

शिवहर : Bihar उत्तर बिहारमध्ये निवडणुकीआधीच पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या या घटनेमुळं अशी हिंसात्मक घडल्यामुळं साऱ्या देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये निवडणुकीआधीच झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. 

शिवहर जिल्ह्यात जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

नारायण सिंह हे समर्थकांसह प्रचारासाठी निघाले असता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये पिपराही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हथसार गावात बेछूट गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यांना प्रचारात सहभागी झालेल्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. ज्यामध्ये एका हल्लेखोराचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत, या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नारायण सिंह हे बिहारच्या शिवहर विधानसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे राहिले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच सिंह हेसुद्धा प्रचाराला निघाले होते. आपल्या कार्यकर्त्यांसह पायीच प्रचाकर करतेवेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीनं रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण, सीतामढी येथील रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

 

Read More