Marathi News> भारत
Advertisement

जम्मूच्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग, जवान शहीद

सीमेपलीकडून झालेल्या फायरिंगमध्ये भारतीय सेनेचे एक जवान शहिद झाले 

जम्मूच्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग, जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानच्या सीमेपलीकडील कुरापती कमी होताना दिसत नाहीत. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये पाकिस्तानतर्फे पुन्हा नापाक कारवाया होऊ लागल्या आहेत. शनिवारी सकाळी पाकिस्तानच्या कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानने सीमारेषेचे उल्लंघन केले. सीमेपलीकडून झालेल्या फायरिंगमध्ये भारतीय सेनेचे एक जवान शहिद झाले आहेत. 57 आरआरचे लांस नायक राजेंद्र सिंह अशी त्यांची ओळख सांगण्यात येत आहे. 

शोपियात चकमक 

भारतीय लष्करी जवानांकडूंन वेळोवेळी मात खाऊनही काश्मीरमधील दहशतवादी मागे हटण्यास तयार नाही आहेत. काहीतरी कुरापत्या करत हे दहशतवादी काश्मीरचे वातावरण खराब करत असतात. आज पहाटे शापिया जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटली नाही आहे. 

दक्षिण काश्मीरच्या शोपियातील बोना बाजारमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली होती. यानंतर जवानांनी संपूर्ण विभागाला घेरले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु केला.

Read More