Marathi News> भारत
Advertisement

शोपियामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

शोपियामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : भारतीय लष्करी जवानांकडूंन वेळोवेळी मात खाऊनही काश्मीरमधील दहशतवादी मागे हटण्यास तयार नाही आहेत. काहीतरी कुरापत्या करत हे दहशतवादी काश्मीरचे वातावरण खराब करत असतात. आज पहाटे शापिया जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटली नाही आहे. 

दक्षिण काश्मीरच्या शोपियातील बोना बाजारमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली होती. यानंतर जवानांनी संपूर्ण विभागाला घेरले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु केला.

सीमारेषेचे उल्लंघन 

एकीकडे शोपियामध्ये जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु असताना दुसरीकडे उत्तरी काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानतर्फे सीमारेषेचे उल्लंघन करण्यात आले आहे. कुपवाडामध्ये आज सकाळी पाकिस्तानी सैनिकांतर्फे गोळीबार करण्यात आला. सीमेवर अचानक झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. 

Read More