Marathi News> भारत
Advertisement

अयोध्येतलं राम मंदिर दशतवाद्यांच्या निशाण्यावर, सुसाईड बॉम्बरकडून उडवण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिली आहे, माहितीनंतर मंदिराभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवली

अयोध्येतलं राम मंदिर दशतवाद्यांच्या निशाण्यावर, सुसाईड बॉम्बरकडून उडवण्याचा कट

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरावर (Ram Mandir) मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जैश ए मोहम्मदने Jaish-e-Mohammed) दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) दिलाय. उत्तर प्रदेशच्या अयोध्येत राम मंदिराचं काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झालंय. 2023 वर्षाच्या अखेरीस मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असा अंदाज आहे. पण आता हे मंदिर सुसाईड बॉम्बरकडून (Suicide Squad) उडवण्याचा कट जैश-ए-मोहम्मदने रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलीय. दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसू शकतात. 

सुरक्षा व्यवस्था वाढवली
गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनंतर राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था आणखी कडेकोट करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) सतर्क झाले असून तपासणी देखील वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताची दहशतवादी संघटना राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखतेय. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

नेपाळमार्गे भारतात घुसण्याचा प्लान
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर पाकिस्तानमधून नेपाळच्या मार्गे भारतात घुसण्याचा कट रचयतायत. जैश ए मोहम्मद यासाठी सुसाईड बॉम्बर तयार करत असल्याची माहिती आहे.

2024 मंदिर दर्शनासाठी खुलं होणार
अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या जगातील सर्वात मोठं आणि भव्य राम मंदिर बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान श्री रामाच्या बालक स्वरुपातील प्रतिमेची या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे महासचिव चंपत राय यांनी नुकतीच ही माहिती दिली. ऑक्टोबर 2023 पर्यंत मंदिराच्या पाया, चौथरा आणि तीन स्तरांपैकी तळाचं बांधकाम काम पूर्ण होतील त्यानंतर 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान रामलल्लाच्या मंदिरामधील गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

दिलेल्या वेळेआधीच पूर्ण होणार मंदिर
अयोध्येमधील राम मंदिर हे नियोजित कालमर्यादेपेक्षा अधिक लवकर बांधून तयार होईल अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे. मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. जवळजवळ 60 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. जानेवारी 2024 रोजी मंदिरातील गर्भगृहाचं काम पूर्ण करुन रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भावी पोलिसांची वाईट अवस्था, कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपून काढावी लागली रात्र

कशी असणार रामलल्लाची मूर्ती
रामलल्लाची मूर्ती ही पाच ते सात वर्षांच्या बालकाच्या रुपातील असेल तसंच या मूर्तीची बोटं कशी असतील, चेहरा कसा असेल, डोळे कसे असतील यासारख्या बाबींवर देशातील मोठमोठ्या मूर्तीकारांशी विचारमंथन सुरु आहे. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीरामाची मूर्ती 8.5 फूट उंचीची असेल. ही मूर्ती घडवण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Read More