Marathi News> भारत
Advertisement

चिदंबरम यांना अटक झाली ही चांगली गोष्ट- इंद्राणी मुखर्जी

माझ्या मुलाला व्यापारात मदत करा, असे चिदंबरम यांनी सांगितले होते. 

चिदंबरम यांना अटक झाली ही चांगली गोष्ट- इंद्राणी मुखर्जी

मुंबई: पी.चिदंबरम यांना अटक झाली, ही उत्तम गोष्ट असल्याचे वक्तव्य शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केले आहे. आयएनएक्स मीडियातील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पी. चिदंबरम सध्या सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 

चिदंबरम यांच्या अटकेसाठीही इंद्राणी मुखर्जी हिने दिलेला जबाब महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले जाते. इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडिया प्रकरणात सहआरोपी आहे. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांची चौकशी केली होती. त्यावेळी इंद्राणी हिने संबंधित व्यवहारात पी.चिदंबरम यांच्या सहमतीने घोटाळा झाल्याची कबुली दिली होती. 

आयएनएक्स मीडियाच्या प्रकल्पाला परकीय गुंतवणूक महामंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळत नव्हती. त्यासाठी इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचे पती पीटर मुखर्जी यांनी नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. पीटर मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्याशी संवाद साधला. तेव्हा माझ्या मुलाला व्यापारात मदत करा, असे चिदंबरम यांनी सांगितले होते. 

तपासयंत्रणांकडे चिदंबरम यांच्याविरोधात ठोस पुरावे नाहीत- काँग्रेस

यानंतर मुखर्जी दाम्पत्याने कार्ती चिदंबरम यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी कार्ती यांनी आपल्याकडे १० लाखांची लाच मागितली होती. ही रक्कम परदेशातील बँक खात्यामध्ये जमा करावी, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती इंद्राणी यांनी तपासयंत्रणांना दिली होती.

Read More