Marathi News> भारत
Advertisement

शेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या

आयटीआर फाइल करण्यास उशीर झालाय, नुकसान अटळ, वाचा ही महत्वाची बातमी   

शेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या

मुंबई : आर्थिक वर्ष 2021-22 वर्षाचा आयटीआर फाइलिंग करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आलीय. अवघे बोटावर मोजण्य़ा इतकेच दिवस उरले आहेत.त्यामुळे तुम्ही जर अजूनही आयटीआर फाइलिंग केलं नसेल तर 31 जुलैआधी करून घ्या नाहीतर तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

3 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले
प्राप्तिकर विभागाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 25 जुलै 2022 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी 3 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. तसेच 20 जुलैपर्यंत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 2.3 कोटी आयकर रिटर्न (ITR) भरले गेले. 

गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) मुदत वाढवून 31 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 5.89 कोटी ITR दाखल करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सुमारे २.९ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. जसजशी शेवटची तारीख जवळ येत आहे, तसतशी आयकर विभागाच्या वेबसाइटवर काही समस्या दिसत आहेत.

तारीख वाढवणार का? 
यावर महसूल सचिवांनी सांगितले होते की, आयटीआर भरण्याची तारीख ३१ जुलैच्या पुढे वाढवण्याचा सरकारचा विचार नाही. गेल्या दोन वर्षांप्रमाणे या वेळीही कर भरण्याची अंतिम तारीख वाढवणे अपेक्षित होते, मात्र आता सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्हाला तुमच्या कार्यालयातून फॉर्म-16 मिळाला असेल, तर विलंब न करता तो भरा, असेही सांगितले जात आहे.  

दरम्यान इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे रिटर्न भरण्यासाठी आता अवघे दिवस उरले आहेत.त्यामुळे प्राप्तिकर विभागाने आवाहन केलं आहे की, ज्यांनी अद्याप त्यांचे विवरणपत्र भरले नसेल तर त्यांनी ते लवकरात लवकर दाखल करावे.

Read More