Marathi News> भारत
Advertisement

जोडीदार आणि वाढीव पगारासोबत बरंच काही, भारतातील IT कंपनीची कर्मचाऱ्यांना आगळी वेगळी ऑफर

लवकरच, कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्षातून दोनदा निश्चित 6 टक्के-8 टक्के वेतनवाढ देऊ करणार आहे.

जोडीदार आणि वाढीव पगारासोबत बरंच काही, भारतातील IT कंपनीची कर्मचाऱ्यांना आगळी वेगळी ऑफर

मुंबई : आजकाल कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.यामध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यापासून ते त्यांचा पगार वाढ चांगला करण्यावरती देखील भर देत आहेत. त्यातच अशा काही कंपन्या ही आहेत, ज्या घरच्या पॉलिसींपासून ते मानसिक-आरोग्यविषयक वेतनापर्यंत कर्मचाऱ्यांना सगळ्या गोष्टी पुरवतात. अशातच मधुराईमधील एक अयटी कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशी काही ऑफर दिली आहे. जी ऐकून सर्वसामान्यांना धक्का बसेल.

मदुराईस्थित श्री मूकांबिका इन्फोसोल्युशन्स (SMI) या आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत मॅच मेकिंग सेवा आणि लग्न केल्यास पगार वाढवण्याची ऑफर दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष कव्हरेज देते.

सुरुवातीपासूनच, SMI ने आपल्या कर्मचार्‍यांना विशेष विवाह वाढीची ऑफर दिली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी जर लग्न केलं, तर त्यांना यानंतर पगार वाढ करुन मिळणार आहे. शिवाय ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना लग्न करण्यासाठी जोडीदार शोधण्यात देखील मदत करते.

लवकरच, कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्षातून दोनदा निश्चित 6 टक्के-8 टक्के वेतनवाढ देऊ करणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे (Attrition Rate)

SMI मधील नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार इतर कंपन्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कंपनीने अनेक वर्षांपासून 10 टक्के एट्रिशन रेट नोंदवला आहे. जो TCS आणि Wipro सारख्या कंपन्यांना टक्कर देक आहे.

असं करण्यामागे कंपनीचा असा उद्देश आहे की, त्यांचे कर्मचारी त्यांना सोडून कुठे ही जाऊ नये, शिवाय एक कंपनी म्हणून आम्हाला कर्मचाऱ्यांच्या भविषाचा देखील विचार करायला हवा. कारण आम्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपल्या भावंडांसारखेच मानतो.

Read More