Marathi News> भारत
Advertisement

इतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?

GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

इतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?

 ISRO Elon Musk  : चांद्रयान 3 च्या यशानंतर जगभरात भारतीय अंतराळ स्थंस्थेचा अर्थात ISRO चा दबदबा वाढला आहे. ISRO चे आदित्य L1 हे मिशन यशस्वी टप्प्यात आले आहे. दुसरीककडे वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंतराळात ब्लॅकहोलचा शोध घेणारा XPoSat हा उपग्रह अवकाशात झेपावला. यानंतर आता ISRO च्या एका महत्वकांक्षी मोहिमेत  Elon Musk मदत करणार आहेत. भारतीय वैज्ञानिकांची युक्ती आणि Elon Musk यांची शक्ती असा हा  ISRO चा पॉवरफुल प्रोजक्ट आहे. 

इस्रो पहिल्यांदाच अवकाशात उपग्रह पाठवण्यासाठी SpaceX च्या हेवी लिफ्ट लॉन्चरचा वापर करणार आहे. GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरची मदत घेणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने  SpaceX च्या माध्यमातून सॅटेलाईट लाँच करण्याबाबतची घोषणा केली. येत्या काही महिन्यातच लाँचिंग केधी होणार या तारखेची घोषणा होऊ शकते.

ISRO का घेणार SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरची मदत ?

व्हेईकल मार्क 3 हे भारताकडे असलेले सध्या सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. मात्र, भारताकडे असलेल्या  GSLV-MK3 लाँचरच्या मदतीने चार हजार किलो वजनाचा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (जीटीओ) नेता येऊ शकतात. याची क्षमताच 4 हजार किलो वजनाचे सॅटेलाईट वाहून नेण्याची आहे. GSAT- 20 हा  संचार उपग्रह 4700 किलो वजनाचा आहे. यामुळेच इस्त्रोने Elon Musk यांच्या SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरची क्षमता 8300 किलो वजनाचे सॅटेलाईट लाँच करण्याची आहे. ISRO ची व्यावसायिक शाखा NSIL म्हणजेच New Space India Limited ने SpaceX शी करार केला आहे. लवकरच लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात येईल.

GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच करण्याचे उद्दीष्ट काय? 

GSAT- 20 ही अर्थ ऑबजर्वेशन रिसेट सॅटेलाइटचीच विकसित मालिका आहे. यात सिंथेटिक अपर्चर रडार लावण्यात आलाय. कधीही आणि कोणत्याही हवामानात तो पृथ्वीवर नजर ठेवणाराय. ढग असतानाही पृथ्वीची पाहणी करून स्पष्ट चित्रं घेणं, हे या उपग्रहाचं वैशिष्ट्य आहे. सीमांच्या देखरेखीमुळे देशाच्या सुरक्षेसाठी हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय शेती तसंच आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. 

ISRO शक्तीशाली लाँचर विकसीत करणार

 ISRO ने सध्या SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरची मदत घेतली असली तरी भविष्यात शक्तीशाली लाँचर विकसीत केले जाणार आहे. यावर ISRO काम करत आहे. भारतीय अंतराळ संस्था नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) विकसित करण्याच्या तयारीत आहे. 10 हजार किलो वजनाचे उपग्रह किंवा उपकरणे ऑर्बिटमध्ये पोहचवण्याची NGLV ची क्षमता असेल. 

 

Read More