Marathi News> भारत
Advertisement

...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Landing : भारतारडून पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि पाहता पाहता चंद्रावरील प्रत्येक दृश्य थेट पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली.   

...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Moon Landing : चंद्र पृथ्वीपासून नेमका किती दूर आहे, असा प्रश्न विचारल्यास आता खरंच सबंध भारतातील नागरिक हा चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ आहे असं म्हणू शकतात. कारण ठरतंय ते म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान 3 मोहिम. चंद्रावर पाणी आहे का, इथपासून चंद्रावरील मातीचे नमुने, त्यांचं परीक्षण या आणि अशा अनेक कारणांच्या अभ्यासासाठी भारतानं चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं पाठवलं. जवळरपास 45 दिवसांच्या यशस्वी प्रवासानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राचं दक्षिण ध्रुव गाठलं. 

चंद्र गाठणारा भारत चौथा देश, तर चंद्राचं दक्षिण ध्रुव गाठणारा पहिलाच देश ठरला. देशाला साजेशी कामगिरी करणाऱ्या या चांद्रयानानं चंद्रावरून फोटो आणि व्हिडीओ पाठवणयास सुरुवात केली तिथं तर या मोहिमेनं परमोच्च शिखरच गाठलं. चंद्रावर लँडरचं पोहोचणं, लँडरमधून प्रज्ञान रोवरचं बाहेर येणं हे कल्पनाशक्तीला शह देणारंच होतं. पण, ही किमया भारतानं करून दाखवली. 

लँडिंगच्या क्षणापासून पुढील 14 दिवसांसाठी चंद्रासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी माहिती इस्रो देशवासियांना देत राहणार आहे. त्यातच आता इस्रोनकडे एक नवा आणि संक्षिप्त व्हिडीओही आला आहे. जिथं चांद्रयानाचं विक्रम लँडर चंद्रावर लँड होताना नेमकी काय परिस्थिती होती, चंद्र कसा जवळ येत होता हे टप्प्याटप्प्यानं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी

 

व्हिडीओमध्ये एका बाजूला लँडरचा काही भाग दिसत आहे, तर दुसरीकडे चंद्रावरून जाणाऱ्या विक्रम लँडरच्या दृष्टीक्षेपात असणारा चंद्राचा पृष्ठभाग अर्थात चंद्राची असमान जमीन दिसत आहे. चंद्रावर असणारे लहानमोठे खड्डेही इथं अगदी स्पष्टपणे नजरेस पडत आहेत. यापूर्वी चंद्राचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामध्ये ही दृष्य काहीशी धुसर होती. पण, या नव्या व्हिडीओमधून चंद्र तुम्हाला अगदी जवळून पाहता येत आहे. पृथ्वीवरून पांढराशुभ्र दिसणारा चंद्र प्रत्यक्षात पाहिल्यास त्याच्या पृष्ठावर राखाडी रंगाची माती किंवा तत्सं पदार्थाची चादर पाहायला मिळत आहे. एरव्ही फोटोंमधून दिसणारे चंद्रावरील खड्डे इथं अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. 

आश्चर्याची बाब म्हणजे चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरनं जेव्हा चंद्राच्या पृष्ठाच्या दिशेनं प्रवास सुरु केला तेव्हा शेवटच्या काही क्षणांमध्ये इस्रो त्याला Commands देऊ शकत नव्हतं. त्यामुळं सर्वस्वी लँडरनंच इथं महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळं हा व्हिडीओ अतिशय खास आहे असंच म्हणावं लागेल. 

 

 

Read More