Marathi News> भारत
Advertisement

केवळ २१ हजारांत आयलँड सफर, IRCTC ची धम्माल ऑफर

भारतीय रेल्वेनं तुमची ही इच्छा पूर्ण करण्याचं मनावर घेतलंय

केवळ २१ हजारांत आयलँड सफर, IRCTC ची धम्माल ऑफर

मुंबई : समुद्राचे किनारे, स्वच्छ पाणी आणि हिरवळ तुमचं लक्ष वेधून घेत असेल तर तुम्हाला एखाद्या आयलँडची सफर करायची नक्कीच ओढ लागली असेल. पण एखाद्या आयलँडवर जायचं म्हणलं तर खिशाला जोरदार फटका पडणार याचीही धास्ती तुम्हाला लागली असेल. परंतु, आता मात्र ही काळजी करण्याची गरज पडणार नाही. कारण, भारतीय रेल्वेनं तुमची ही इच्छा पूर्ण करण्याचं मनावर घेतलंय. 

IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशन) नं आखलेला प्लान तुम्हाला हवाहवासा वाटणारा आणि तुमच्या खिशाला परवडणारा असा आहे. IRCTC चं हे शानदार पॅकेज कोलकात ते अंदमानसाठी ४ रात्री आणि ५ दिवसांचं आहे. IRCTC च्या ऑफिशिअल वेबसाईटनुसार, इंडिगोच्या इकोनॉमी क्लासनं तुम्ही कोलकाता ते अंदमानपर्यंत प्रवास कराल. 

१५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू होणाऱ्या या टूरसाठी २१,१२० रुपये प्रति व्यक्ती असेल. यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. डबल ऑक्युपेन्सीवर IRCTC ला २१,०००  रुपये आणि मुलांसाठी १९,८१५ रुपये असतील. 

१ ते ४ वर्षांपर्यंतची मुलांसाठी मात्र कोणतीही फी आकारली जाणार नाही. मुलं आपल्या पालकांसोबत हॉटेलमध्ये उतरू शकतील. २ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी विमानाचं तिकीट मात्र आवश्यक असेल. 

या टूरसाठी विमान कोलकाताहून ७.३५ ला उड्डाण भरेल आणि ९.५० ला पोर्ट ब्लेअरला पोहचेल. परतीचं विमान १०.२० वाजता निघून १२.३५ ला कोलकाताला पोहचेल. 

या पॅकेजमध्ये सर्व जागांवर डबल शेअरिंग बेसिसवर एसी एकोमोडेशन सामील आहे. याशिवाय यामध्ये एन्ट्री परमिट, एन्ट्री तिकीट, फेरी तिकीट, फॉरेस्ट एरिया परिमिटस् यांचा समावेश आहे. 

अधिक माहितीसाठी IRCTC टूरिझमच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊ शकाल.  

Read More