Marathi News> भारत
Advertisement

IRCTC ने केले तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल

लॉन्ग विकेंड आले की अनेकदा मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आयत्या वेळेस सुट्ट्यांचे प्लॅनिंग केले जाते. अशावेळी आरामदायी आणि खिशाला परवडेल अशा वाहनसुविधा म्हणजे रेल्वे प्रवास.  मग आयत्या वेळेस तुम्ही रेल्वे बुकिंग करणार असाल तर रेल्वे प्रशासनाने केलेले 'तात्काल बुकिंग'मधील हे बदल वेळीच जाणून घ्या.  

IRCTC ने केले तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल

 मुंबई : लॉन्ग विकेंड आले की अनेकदा मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आयत्या वेळेस सुट्ट्यांचे प्लॅनिंग केले जाते. अशावेळी आरामदायी आणि खिशाला परवडेल अशा वाहनसुविधा म्हणजे रेल्वे प्रवास.  मग आयत्या वेळेस तुम्ही रेल्वे बुकिंग करणार असाल तर रेल्वे प्रशासनाने केलेले 'तात्काल बुकिंग'मधील हे बदल वेळीच जाणून घ्या.  

10 वाजता एसी तात्काळ बुकिंग  

एसी कोचसाठी सकाळी 10 वाजता आणि नॉन एसी कोचसाठी सकाळी 11 वाजता तात्काळ तिकिटांचं बुकिंग होतं. तात्काळ तिकीट बुकिंग हे एक दिवस आधी केले जाते. आयत्या वेळेस रेल्वेकडून काही बदल झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम 100 % परत केली जाते. 

तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये झालेले बदल  

रेल्वे नियमांनुसार जर ट्रेनला 3 तासाहून अधिक वेळ उशीर झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम आणि तात्काळ शुक्ल परत मिळवण्यासाठी क्लेम करता येऊ शकतो. 

रेल्वेने ठरवून दिलेल्या रूटपेक्षा ट्रेन इतर मार्गाने जात असल्याने त्याबाबतही प्रवासी क्लेम करू शकतात.  

प्रवासी लोअर क्लासमध्ये प्रवास करू इच्छित नसतील तर त्यांना पूर्ण  रिफंडसाठी क्लेम करण्याची संधी मिळते.   
 
रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार, तात्काळ तिकिटच्या बुकिंग वेळेस आयडी प्रुफ दाखवावा लागत नाही. मात्र प्रवासादरम्यान तुमच्यासोबत आयडी प्रुफ दाखवावा लागतो.  

 'ट्रेन 18' करणार शताब्दीला रिप्लेस  

 आईसीएफनुसार, परदेशात ट्रेन बनवण्याच्या तुलनेत भारतामध्ये 'ट्रेन 18' ही 16 चेअर कार कोच भारतामध्ये निम्म्या किंमतीमध्ये बनवली जाते. या ट्रेनमध्ये एक्सिक्युटीव्ह आणि नॉन एक्सीक्युटीव्ह क्लासमध्ये उपलब्ध असेल. 

Read More