Marathi News> भारत
Advertisement

इंटरनेट सेवा १४, १५ जुलै रोजी बंद राहणार, काय कारण?

 १४ आणि १५ जुलै या दोन दिवशी इंटरनेट सेवा  बंद राहणार आहे. 

 इंटरनेट सेवा १४, १५ जुलै रोजी बंद राहणार,  काय कारण?

जयपूर : आजकाल इंटरनेटमुळे स्मार्टफोनचा वापर वाढलेला दिसत आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या जाळ्यात अनेक जण गुंतलेले दिसून येतात. इंटरनेटच्या वापरामुळे कॉपी होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ते रोखण्यासाठी दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १४ आणि १५ जुलै या दोन दिवशी इंटरनेट सेवा  बंद राहणार आहे.  दरम्यान, पोलीस भरती परीक्षेत कॉपीचे गैर प्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेतली जाणार आहे.

इंटरनेटचा गैरवापर होत असल्याची बाब पुढे आलेय. इंटरनेटचा वापर परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी केला जात आहे. यामुळे कॉपीचे हे गैरप्रकार रोखण्यासाठी जयपूरमध्ये दोन दिवसइंटरनेटसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. १४ व १५ जुलैला जयपूरमध्ये पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापासून ५ किलोमीटर पर्यंतच्या परीसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे.

पोलीस मुख्यालयाने ऑफलाइन परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी हे  पाऊल उचलले आहे. ६६४ केंद्रांमध्ये पोलीस भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस विभागातील १३,१४२ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यासाठी तब्बल १५ लाखापेक्षा आधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 

Read More