Marathi News> भारत
Advertisement

भारताच्या ताकदवान इमेजिंग सॅटेलाईटचं आज लॉन्चिंग

भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. 

भारताच्या ताकदवान इमेजिंग सॅटेलाईटचं आज लॉन्चिंग

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या (ISRO) सर्वात ताकदवान इमेजिंग सॅटेलाईटचं काऊंट डाऊन सुरु झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांपासून लॉन्चिंगसाठी काऊंट डाऊन सुरु आहे. आज दुपारी ३.२५ वाजता हे इमेजिंग सॅटेलाईट लॉन्च होणार आहे. सोबतच PSLVC48 च्या चौथ्या टप्प्यातील PS4 साठी ऑक्सिडायझरही भरण्यात आलं आहे.

या इमेजिंग सॅटेलाईटचं  नाव RISAT2BR1 आहे. ते अवकाशात तैनात झाल्यानंतर भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. तसेच, शत्रूंवर लक्ष ठेवणंही अधिक सोपं होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून या उपग्रहाचं लॉन्चिंग केलं जाणार आहे.

भारताचं ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण रॉकेट (पीएसएलव्ही)  आज देशातील अद्ययावत गुप्तचर उपग्रह RISAT2BR1 आणि नऊ परदेशी उपग्रहांचं लॉन्चिंग करणार आहे.

  

Read More