Marathi News> भारत
Advertisement

देशातला पहिला 'क्राईम शो' करणारा निघाला बायकोचा खुनी

दिल्लीमधल्या एका कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

देशातला पहिला 'क्राईम शो' करणारा निघाला बायकोचा खुनी

नवी दिल्ली : दिल्लीमधल्या एका कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. १७ वर्षांपूर्वी बायकोचा चाकू खूपसून खून केल्याप्रकरणी सुहैब दोषी आढळला आहे. याप्रकरणी सुहैबला कमीतकमी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. २० डिसेंबरला शिक्षेबाबत कोर्ट निर्णय देणार आहे.

११ जानेवारी २००० साली सुहैबची पत्नी अंजूच्या शरिरावर चाकूचे वार करण्यात आले होते. जखमी अवस्थेमध्येच अंजूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला.

इंडियाच मोस्ट वाँटेड हा देशातला पहिला क्राईम शो करणारे सुहैब इलियासी चर्चेत आले होते. पण पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून सुहैबला २८ मार्च २००० साली अटक करण्यात आली होती. हुंड्यासाठी सुहैबनं अंजूवर अत्याचार केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला होता. यानंतर सुहैबवर खटला चालला होता. 

Read More