Marathi News> भारत
Advertisement

उन्हाळ्यात पर्यटकांचा कल परदेशातील बेटांकडे

कोणत्या देशांना प्राधान्य

उन्हाळ्यात पर्यटकांचा कल परदेशातील बेटांकडे

मुंबई : मुंबईमध्ये पारा 38 अंशांवर पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळा आजवरचा सर्वाधिक कडाक्याचा ठरण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्र अशा पश्चिम भारतातील पर्यटकांनी परदेशातील मॉरिशस, रीयुनियन बेटे आणि सेशेल्स अशा परदेशातील थंड बिचवर जाण्याचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत, यंदा या ठिकाणांना असलेली मागणी 15% वाढली आहे. थंडाव्यासाठी पर्यटक डोंगराच्या दिशेने जात असताना, बिच डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे कशामुळे अधिक आकर्षक ठरतात? याचे उत्तर म्हणजे हवामान. 

हवामान मुख्य कारण

मॉरिशसमध्ये मे महिन्यापासून हिवाळा सुरू होणार असून तेव्हा तेथील हवामान आल्हाददायक व सुखकारक असते. एप्रिलमध्ये हंगाम बदलत असल्याने या द्विपसमूहाला भेट देण्यासाठी एप्रिल महिनाही योग्य ठरतो. मदगस्करच्या पूर्वेकडे असलेली रीयुनियन बेटे हे लोकप्रिय होत असलेले ठिकाण आहे. येथे मे महिन्यात हिवाळा सुरू होतो आणि एप्रिल व मे या दरम्यान तापमान 24-22 °C या दरम्यान असू शकते. सेशेल्समध्ये आग्नेय वारे मे ते नोव्हेंबर या दरम्यान नियमितपणे वाहत असतात आणि वर्षातला हा सर्वात आल्हाददायक कालावधी असतो. मेमध्ये तुलनेने कोरडी हवा असते, आकाश शक्यतो निरभ्र असते व थोडासा रिमझिम पाऊस पडतो.

फिरण्यासाठीचे नवीन नवीन ट्रेड

एप्रिल आणि मे महिन्यात येथे असलेल्या प्रसन्न हवामानामुळे बिचप्रेमी पर्यटकांना, तसेच उन्हाळ्यात हिल स्टेशन टाळणाऱ्यांना ही बेटे आकृष्ट करत आहेत. नव्या ट्रेंडविषयी बोलताना, कॉक्स अँड किंग्सचे रिलेशनशिप हेड करण आनंद यांनी सांगितले की, “पर्यटकांना सतत नवनवीन ठिकाणी जायचे असल्याने पर्यटनाचे ट्रेंड सध्या बदलत असतात. यंदा उन्हाळ्यात युरोपला असलेली पसंती ही या वर्षीही कायम आहे, तर मॉरिशस, रीयुनियन बेटे व सेशेल्स ही ठिकाणेही भारतातील पर्यटकांना उन्हाळी बेत आखण्यासाठी भुरळ घालत आहेत. विमान सेवेत सुधारणा व व्हिसाची सुलभ प्रक्रिया यामुळे इंडियन ओशन बेटांना असलेली मागणीही आणखी वाढली आहे.”

विमान सेवा सुधारल्याचा फायदा

सुधारलेली विमान सेवा ही ठिकणे लोकप्रिय करण्यामध्ये मोठी भूमिका बजावते. एअर इंडिया व एअर ऑस्ट्रिअल यांनी संयुक्तपणे रीयुनियन बेटांसाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोची येथून थेट विमान सेवा सुरू केली आहे. एअर सेशेल्सने मुंबई व सेशेल्स या दरम्यान आठवड्यातून पाच वेळा थेट विमान सेवा सुरू केली आहे व यामुळे हनिमूननिमित्त सेशेल्सला जाणाऱ्या भारतीयांची संख्या गेल्या वर्षापासून जवळजवळ दुप्पट झाली आहे. मॉरिशससाठी मुंबईहून चार थेट विमाने आहेत, दिल्लीहून दोन व चेन्नईहून बेंगळुरूद्वारे तीन विमाने आहेत. गर्दीच्या कालावधीत एअर मॉरिशसची विमान सेवा दररोज उपलब्ध करणयाची घोषणा मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केले आहे.

सुलभ व्हिसा प्रक्रिया

भारतीय पर्यटकांना ही बेटे आकृष्ट करत असल्याचे अन्य कारण म्हणजे, 'सुलभ व्हिसा प्रक्रिया'. भारतीय पर्यटकांना मॉरिशस व सेशेल्स या दोन्ही ठिकाणी व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. रीयुनियन बेटांवर जाण्यासाठी भारतीय नागरिकांना 15 दिवसांपर्यंत वास्तव्य करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. या ठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची प्रक्रिया सुलभ असल्याने प्रवास विनासायास होतो व आयत्या वेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठीही ही ठिकाणी सोयीची ठरतात. सेशेल्स व रीयुनियन बेटे प्रामुख्याने स्वतंत्र पर्यटक व जोडपी यांचे लक्ष वेधत असून, मॉरिशस फॅमिली
हॉलिडेसाठी लोकप्रिय आहे. भारतीय प्रवाशांनी अलीकडेच शोधून काढलेले रीयुनयन बेटे हे ठिकाण व्होल्कॅनिक, रेनफॉरेस्टेड आहे, कोरल रीफ व किनारे असलेले आहे. पिटन दे ला फोर्नेस हा जगातील सर्वात सक्रिया ज्वालामुखींपैकी एक असून आवर्जून द्यावा, असा असून त्याच्याकडे जाणाऱ्या मार्गातील सृष्टसौंदर्य
वाखाणण्यासारखे आहे. ज्वालामुखीकडे जाणारा रस्ता मंगळाकडे गेल्याप्रमाणे अनुभव देतो. 

Read More