Marathi News> भारत
Advertisement

रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल, रेल्वेनेच दिली माहिती पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम 

रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुकिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तिकीट बुकिंग अॅप आणि साइट दोन्ही अपडेट करण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग सेवेसोबत आता वेगवेगळ्या सुविधाही देण्याच्या विचारात आहे. यासोबत प्रवाशांच्या गरजाही पूर्ण होऊ शकतील अशी व्यवस्था करण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाचा आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिकिट प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्यासाठी वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत. अनेक वेळा प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन तिकिटाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर करण्यासाठी काही बदल करण्यात येणार आहेत. 

NGET सिस्टिमला सतत अपडेट करण्यात येत आहे. 2016-17 मध्ये एका मिनिटाला 15,000 तिकीट, तर 2017-18 रोजी 18,000 तिकीट प्रति मिनिटाला बुक केली जात होती. आता आयआरसीटीसी वेबसाईटवरून प्रत्येक मिनिटाला 25 हजार तिकीट बुक करण्याची क्षमता आहे. 5 मार्च 2020 मध्ये 26 हजार 458 तिकीट बुक झाले होते. 

त्यामुळे आता तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर तुम्हीला वेगवेगळ्या सुविधा देखील यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. यावर रेल्वे मंत्रालयाकडून काम सुरू आहे. त्यामुळे आता प्रवास सोयीचा होण्याची शक्यता आहे. 

Read More