Marathi News> भारत
Advertisement

प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 'हा' नियम तोडलात तर, थेट तुरूंगात जाल

Indian Railway rule : तुम्ही विचार न करता चिप्स, इतर खाद्यपदार्थांचे रॅपर किंवा इतर काहीही रेल्वे स्टेशनवर फेकत असाल तर सावधान... असे केल्याने तुरुंगात जाऊ शकता...

प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 'हा' नियम तोडलात तर, थेट तुरूंगात जाल

नवी दिल्ली:Indian Railways : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. या दरम्यान बरेच प्रवासी काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावधान. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे. एवढेच नाही तर या सवयीमुळे तुमच्यावर खटला (police case registered) देखील दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुरूंगात जावे लागेल.

एनजीटीकडून आदेश केला जारी

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश (NGT orders) जारी केले आहेत. हे आदेश IRCTC ने सर्व स्टेशन प्रभारींना पाठवले आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता स्थानकावर घाण पसरवू नका. बॉक्समध्येच कोणतेही रॅपर ठेवा. जेणेकरून स्थानकावर घाण होणार नाही. काहीवेळा हे रॅपर्स जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांमध्येही अडकतात. त्यामुळे चाके जॅम होऊन अपघाताचा धोका वाढतो.

घाण पसरवल्याबद्दल होऊ शकतो तुरुंगवास 

एनजीटीने नुकतेच रेल्वेला त्यांची स्थानके स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रेल्वेने नियम बदलून फलाटावर घाण पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत केवळ दंड वसूल करून संबंधित व्यक्तीला सोडले जात होते.

रेल्वे ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र उड्डाण पथक तयार करण्यात आलं आहे. ते वेळोवेळी सरप्राईज चेकिंग करतील. झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या आदेशानंतर अनेक स्थानकांवरही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Read More