Marathi News> भारत
Advertisement

बाप रे! गुजरातमध्ये 2 हजार कोटींचं ड्रग्स जप्त, भारतीय नौदलाची मोठी कारवाई

या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे.

बाप रे! गुजरातमध्ये 2 हजार कोटींचं ड्रग्स जप्त, भारतीय नौदलाची मोठी कारवाई

अहमदाबाद : भारतीय नौदलाला (Indian Navy) शनिवारी मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय नौदलाने पाकिस्तानातून (Pakistan) सागरी मार्गाने भारतात आणल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचा (drugs) मोठा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची  किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून भारतीय नौदलाला माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय नौदलाने कारवाई करत आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून ड्रग्जचा साठा पकडला. पाकिस्तानातून मासेमारीच्या बोटीतून अंमली पदार्थांचा साठा भारतात आणला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधी जानेवारी महिन्यात गुजरातमधल्या कच्छमधील मुंद्रा बंदरात (Mundra Port) मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या पथकाने कंटेनरमध्ये लपवून ठेवलेला अमेरिकन गांजा जप्त केला होता. 

16 सप्टेंबर 2021 रोजी गुजरातमधील याच मुंद्रा बंदरात अफगाण हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. ज्याची किंमत 9000 कोटींहून अधिक होती. आतापर्यंत जप्त करण्यात आलेला हा इतिहासातील सर्वात मोठा अंमली पदार्थ्यांचा साठा होता

Read More