Marathi News> भारत
Advertisement

'फौज को आप पर गर्व है', आर्मी ऑफिसरने केलं पोलिसांचं कौतूक

लष्करी अधिकाऱ्याकडून पोलिसांचं कौतूक

'फौज को आप पर गर्व है', आर्मी ऑफिसरने केलं पोलिसांचं कौतूक

नवी दिल्ली : बीकानेर पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लष्कराचे एक अधिकारी पोलिसांचं कौतूक करताना दिसत आहेत. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय जवानांचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. पण एका लष्कराच्या अधिकाऱ्याने कोरोनाच्या संकटात पोलीस करत असलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यांनी त्यांनी मिठाई देखील दिली. हा व्हिडिओ अभिनेते अनुपम खेर यांनी देखील रिपोस्ट केला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदार पोलिसांकडून पार पाडली जात आहे. अनेक ठिकाणी आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ही कोरोनाची लागण होत आहे. तर काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. तरी देखील पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.

Read More