Marathi News> भारत
Advertisement

'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी

India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...   

'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी

India slammed Pakistan over PoK : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी वादाची ठिणगी दिवसागणिक आणखी धुमसताना दिसत असून, इथं सीमेपलीकडून भारतात सातत्यानं घुसखोरीचा प्रयत्न सुरु असताना तिथं जागतिक स्तरावरही आता भारत आणि पाकिस्तान संघर्ष आणखी चिघळताना दिस आहे. नुकतंच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताकडून पाकिस्तानला धारेवर धरण टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या आधारहीन वक्तव्यांवरून भारतानं 'राईट टू रिप्लाय'च्या अधिकाराअंतर्गत उत्तर देत पाकच्या नाकी नभ आणले. यानिमित्तानं फक्त पाकिस्तानच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला. पाककडून दहशतवाद्यांना आसरा दिला जात असून, या देशानं अद्यापही मुंबई हल्ल्याची आरोपींवर कारवाई केली नसल्याचा मुद्दा यावेळी भारताकडून प्रकाशात आणण्यात आला. 

न्यूयॉर्कमध्ये भारतीय मिशनच्या  1st सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी भारताची बाजू संयुक्त राष्ट्रांमध्ये उचलून धरली. भारताविरोधी वक्तव्य करताना पाकिस्तानला जागीच रोखच जेव्हाजेव्हा 'या' व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा पाकिस्तानचं नाव एका सराईत गुन्हेगाराप्रमाणं पुढं येतं अशा जळजळीत शब्दांत भारतानं पाकिस्तानला निरुत्तर केलं. 'आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश भारताचाच अविभाज्य भाग आहेत. शिवाय जम्मू काश्मीर आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित सर्व प्रकरणं भारतातील अंतर्गत घडामोडींचा भाग आहे. त्यामुळं पाकिस्तानला आमच्या घरगुती वादांमध्ये आपली प्रतिक्रिया देण्याचा कोणताही हक्क नाही', असं गहलोत यांनी खडसावलं. 

आधी पाकव्याप्त काश्मीर रिकामं करा... 

पाकिस्तानला जशास जसं उत्तर देताना भारतानं, शेजारी राष्ट्रानं पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडावा असं म्हणताना, 'आधी पाकव्याप्त काश्मीर रिकामं करा...' असा इशारा दिला. इतर गोष्टींमध्ये गुंतण्याऐवजी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी असंही भारतानं पाकिस्तानला खडसावलं. दक्षिण आशिया भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पारिस्ताननं सीमेपलीकडे दहशतवाद रोखून जहशतवादाचा पायाच नष्ट करावा, अवैधरित्या ताब्यात घेतलेल्या भारतीय भूखंडाचा ताबा सोडाला आणि पाकिस्तानात सातत्यानं अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होणं तातडीनं थांबवावं असे तीन मार्ग सुचवले. 

हेसुद्धा वाचा : एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी? 

 

पाकिस्तानमध्ये सध्याच्या घडीला अल्पसंख्यांक समुदाय, हिंदू आणि ख्रिस्तधर्मीय महिलांची स्थिती अतिशय दयनीय आहे. असं सांगताना दरवर्षी पाकिस्तानात सरासरी 1000 महिलांचं अपहरण करत त्यांना बळजबरीनं धर्मपरिवर्तन आणि विवाह करण्यासाठी भाग पाडलं जात असल्याची आकडेवारी भारताकडून सादर करण्यात आली. भारताकडून एकामागून एक होणारे हे वार पाहताना पाकिस्तानही निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं.  

Read More