Marathi News> भारत
Advertisement

देशात गेल्या 24 तासांत 'इतके' नवे कोरोना रुग्ण

देशात तिसरी लाट...

देशात  गेल्या 24 तासांत 'इतके' नवे कोरोना रुग्ण

मुंबई :  देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं आहे. रुग्ण संखेत आणि मृत्यू संख्येतही भर पडत असल्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात देशात 3 लाख 33 हजार 533 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. 

तर कोरोना व्हायरसमुळे  525 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. 24 तासात 2 लाख 59 हजार 168 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या 21 लाख 87 हजार 205 आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 17.78 टक्के आहे.

Read More