Marathi News> भारत
Advertisement

Devendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

Devendra Fadnavis :  भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट  अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

Devendra Fadnavis On Sharad Pawar : भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या  वक्तव्याचा जाहीर विरोध केला आहे. अयोध्येतून फडणवीस यांनी हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे.

भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.  शरद पवारांनी अयोध्या दौ-यावरून टीका केली. राज्यासमोरचे मुख्य प्रश्न सोडून अयोध्या दौरा कशाला असा सवाल पवारांनी  उपस्थित केला होता.  आमची श्रद्धा आहे, त्यांची नसेल असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली.  रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिराला सोन्याचा धनुष्यबाण भेट दिला. हा धनुष्यबाण 2 तोळ्याचा आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती. ते स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद झाल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. 

आम्ही अयोध्या दौ-यावर आलो असलो तरी शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, शेतक-यांकडे दुर्लक्ष होणार नाही अशा सूचना जिल्हाधिका-यांना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. इतकच नाही तर देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करणारे देशद्रोही आहेत असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. 

Read More