Marathi News> भारत
Advertisement

Good News : पीएफच्या व्याज दरात वाढ

केंद्र सरकारने पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ केली आहे.

Good News : पीएफच्या व्याज दरात वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीआधी सर्वच घटकातील लोकांना खूश करण्याचा सपाटा सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्याआधी केंद्र सरकारने देशातल्या नोकरदारांना दिलासा दिला आहे. पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवर ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २०१८-१९ या वर्षासाठी लागू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पीएफवरचा व्याज दर ८.५५ टक्क्यांवरून थेट ८.६५ टक्के झाला आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाला याचा थेट लाभ मिळणार आहे. आज ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टची बैठक झाली. या बैठकीत पीएफवरील व्याज दर वाढवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.

Read More