Marathi News> भारत
Advertisement

नोकरीच्या शोधात असलेल्या देशातील तरुणांना धक्का देणारी बातमी

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) आकड्यांत मुख्यत: कमी वेतनाच्या नोकऱ्यांचा समावेश असतो

नोकरीच्या शोधात असलेल्या देशातील तरुणांना धक्का देणारी बातमी

मुंबई : चालू आर्थिक वर्षात आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणार आहेत. तब्बल १६ लाख रोजगार घटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 'एसबीआय'च्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या आर्थिक वर्षात ८९.७ लाख नवे रोजगार तयार झाल्याची आकडेवारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजे EPFO नं दिली होती. यंदा भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही संख्या किमान पंधरा लाखानं घटण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

देशात अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीचा रोजगारावरही परिणाम झालेला दिसून येतोय. चालू आर्थिक वर्ष अर्थात २०१९-२० मध्ये गेल्या आर्थिक वर्ष अर्थात २०१९८-१९ च्या तुलनेत नोकऱ्यांत १६ लाखांची घट दिसून येऊ शकते. 

गेल्या आर्थिक वर्षात ८९.७ लाख नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. एसबीआयची रिचर्स रिपोर्ट 'इकोरॅप'नुसार, आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिसा यांसारख्या राज्यांत नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी बाहेर गेलेल्या व्यक्तींडकडून घरी धाडल्या जाणाऱ्या रक्कमेतही घट झालेली दिसून येतेय. याचाच अर्थ ठेका श्रमिकांच्या संख्येतही घट झालीय.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) आकड्यांत मुख्यत: कमी वेतनाच्या नोकऱ्यांचा समावेश असतो. यामध्ये वेतनाची कमाल सीमा १५,००० रुपये मासिक असते. परंतु, ईपीएफओमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांचा किंवा खासगी काम-धंदे करणाऱ्या लोकांच्या आकड्याचा समावेश नाही. 

Read More