Marathi News> भारत
Advertisement

देशात कोरोनाचे २० हजार ४७१ रुग्ण, ३९५९ बाधित रुग्ण ठणठणीत

  देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता  २० हजार ४७१  झाली आहे. तर ३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोनाचे २० हजार ४७१ रुग्ण, ३९५९ बाधित रुग्ण ठणठणीत

नवी दिल्ली : देशभरात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे ५० जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता  २० हजार ४७१  झाली आहे. आतापर्यंत या आजाराने एकूण ६५२ जण मरण पावले आहेत तर ३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले आहेत.

आयसीएमआर, अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आतापर्यंत देशभरात ४ लाख ६२ हजार ६२१ संशयितांच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली आहे. बुधावारी दिवसभरात २६ हजार ८४३ नमुन्यांची तपासणी झाली. देशभरात आतापर्यंत २१७ सरकारी तर ८७ खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणू संसर्ग चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

fallbacks

 राष्ट्रपती भवन सचिवालयातला कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनाने दिले आहे. दिल्लीतल्या बी. एल. कपूर रुग्णालयात एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातली व्यक्ती आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, ही व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मृताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याच्या कुटुंबातल्या इतरांना या विषाणूची बाधा झालेली नाही. असे असले तरी खबदारी म्हणून ती व्यक्ती राहत असलेल्या परिसरातल्या ११५ कुटुंबांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Read More