Marathi News> भारत
Advertisement

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकार राजीव शर्माला अटक

 दिल्लीतून ग्लोबल टाईम्सच्या ३ हेरांना अटक 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकार राजीव शर्माला अटक

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून ग्लोबल टाईम्सच्या ३ हेरांना अटक स्पेशल सेलकडून करण्यात आलीय. चीनी महिला आणि तिच्या नेपाळी सहकाऱ्यासह एका फ्रीलान्सर पत्रकाराला ताब्यात घेतलंय. देशातील गोपनीय माहिती दुसऱ्या देशांना पुरवत असल्याचा यांच्यावर आरोप आहे.

सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने दिलेल्या माहीतीच्या आधारे राजीव शर्मा या फ्रिलान्सर पत्रकाराला ताब्यात घेण्यात आलंय. गेले ४० वर्ष हा पत्रकारिता करत असून १० वर्षांपासून फ्रिलान्सिंग करतोय. २०१६ हा पत्रकार चीनी इसम मायकल जॉर्जच्या संपर्कात आला. ज्याच्यामुळे त्याला ग्लोबल टाईम्समध्ये लिहिण्याची संधी मिळाली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.

शैल कंपनी आणि हवाल्यातून पैसा 

शर्मा हा २०१९ पासून जॉर्जच्या संपर्कात असून देशाची गोपनीय माहिती पुरवत असे. यासाठी शर्माला हवाला आणि इतर माध्यमातून पैसे मिळत. शर्माने जॉर्जसोबत मिळून एक शैल कंपनी बनवली होती. ही कंपनी महिपालपूरमध्ये होती. औषध एक्स्पोर्टच्या माध्यमातून ४० ते ४५ लाखांचा व्यवसाय सुरु होता.
 
मीडिया आणि PIB कार्डच्या माध्यमातून शर्मा लोकांना भेटत असे. आणि माहीती पुढे पाठवत असे. गोपनीय माहिती पाठवण्यासाठी शर्माला ५०० अमेरिकन डॉलर मिळायचे. या संदर्भात काही कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.

चीनकडून LAC वर पंजाबी गाणी

सध्याच्या घडीला भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी म्हणून चीनकडून LAC वर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याचं कळत आहे. पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या पँगाँग लेकपाशी असणाऱ्या फिंगर 4 क्षेत्रातील भागात चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सतत पंजाबी गाणी वाजवण्यात येत आहेत. 

भारतीय सैन्याची एकंदर तयारी पाहता चीननं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय सैन्य फिंगर 4 जवळूनच चीनच्या सैन्यावर करडी नजर ठेवून आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ज्या पोस्टवर चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत तेथे चोवीस तास भारताकडून नजर ठेवली जात आहे. 

आतापर्यंत भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी तणावाची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्रालय, मित्र राष्ट्र अशा सर्व मार्गांनी या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण, अनेक चर्चांनंतरही सीमेवर असणारी तणावाची परिस्थिती मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. 

Read More