Marathi News> भारत
Advertisement

सरन्यायाधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची महाभियोगाची नोटीस

विरोधी पक्षांकडून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव

सरन्यायाधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची महाभियोगाची नोटीस

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात पदाचा दूरपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  महाभियोगात दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षाच्या ६० राज्यसभा खासदारांनी, महाभियोग नोटीसवर सह्या केल्या आहेत. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांना महाभियोग नोटीस सोपवली आहे. डावे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने या प्रस्ताववर सह्या केल्या आहेत.

सध्या टीएमके, तृणमूल काँग्रेस, आणि डीएमकेने महाभियोग नोटीसवर अजून सह्या केलेल्या नाहीत.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोगावर ज्या ज्या पक्षांनी सह्या केल्या आहेत, त्यात काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, मुस्लीम लीग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे.

Read More