Marathi News> भारत
Advertisement

घरबसल्या तुमच्या बँकेची शाखा बदला, पण कसं? जाणून घ्या Step By Step प्रक्रिया

तुमच्यासोबत देखील असं होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

घरबसल्या तुमच्या बँकेची शाखा बदला, पण कसं? जाणून घ्या Step By Step प्रक्रिया

मुंबई : अनेक वेळा नोकरी किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना महत्त्वाच्या कामामुळे किंवा बदलीमुळे आपले ठिकाण किंवा घर बदलावे लागते. अशा परिस्थितीत वारंवार होम ब्रँचमध्ये जाऊन काम करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकांची महत्वाचे कामे रखडली जाताता, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तुमच्यासोबत देखील असं होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेची शाखा सहज बदलू शकता.

त्याची स्टेप टू स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया.

गृह शाखा बदलण्याची प्रक्रिया

बँकेच्या शाखा बदलण्याचे नियम बँकेनुसार वेगळे आहेत. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुमच्या बँक खात्याची होम शाखा बदलू इच्छित असाल तर तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. यासाठी तुमचे इंटरनेट बँकिंग कार्यरत असणे आवश्यक आहे. जर असे होत नसेल, तर तुम्ही प्रथम इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

- सर्वप्रथम www.onlinesbi.com या वेबसाइटवर जा.
- तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असल्यास, पर्सनल बँकिंग पर्यायावर जाऊन लॉग इन करा.
- जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर आधी तुमचा आयडी रजिस्टर करा
- आता 'ई-सर्व्हिसेस' या पर्यायावर क्लिक करा
- पुढे, बचत खात्याच्या पर्यायावर जा.
- SBI मध्ये खाते असल्यास, ट्रांसफर करायचे असलेले खाते आपोआप निवडले जाईल
- आता तुम्हाला जिथे खाते ट्रांसफर करायचे आहे त्या शाखेचा शाखा कोड टाका
- त्यानंतर गेट ब्रँच नेम हा पर्याय निवडा आणि नवीन शाखा निवडा
- आता नवीन शाखेचे नाव टाका, सबमिट करा
- एकदा सबमिट केल्यानंतर, तुमची बँक शाखा बदलण्याची विनंती देखील नोंदविली जाईलॉ

PNB मध्ये बँक शाखा बदलण्याची प्रक्रिया

- यामध्ये तुम्ही रिटेल इंटरनेट बँकिंगद्वारे लॉगिन करा
- यानंतर इतर सेवांच्या पर्यायावर क्लिक करा आणि होम ब्रांच बदला हा पर्याय निवडा
- आता खाते ज्या शाखेत ट्रांसफर करायचे आहे तो आयडी निवडा
- शाखा आयडी एंटर केल्यानंतर पुढे जा आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका.
- संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमची विनंती नोंदवली जाईल.

Read More