Marathi News> भारत
Advertisement

UPSC परीक्षेत आवडीची रँक मिळाली नाही, म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली, पण...

नम्रता जैन ही मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्सलग्रस्त अशांत गीदाम भागातील आहेत.

UPSC परीक्षेत आवडीची रँक मिळाली नाही, म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली, पण...

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे मानले जाते. या परीक्षेत पास होणे सहजासहजी शक्य नाही. यासाठी काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, तर काही विद्यार्थ्यांना अनेक प्रयत्नांनंतर यशाची चव चाखता येत नाही. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात वाढलेल्या नम्रता जैन हिच्यासोबत मात्र काही वेगळंच घडलं.

नम्रता जैन ही मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अशांत गीदाम भागातील आहेत. तिच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर, ती हायस्कूलसाठी दुर्ग जिल्ह्यात गेली आणि अभियांत्रिकी पदवीसाठी भिलाईला गेली. 

त्यानंतर तिने UPSC ची परीक्षा दिली आणि काय आश्चर्य तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC 2016 मध्ये AIR 99 मिळवले. त्यानंतर ती आयपीएस अधिकारी झाली. परंतु तिचं स्वप्न काही वेगळं होतं. तिला IPS नाही तर IAS अधिकारी बनायचे होते, म्हणून तिने UPSC परीक्षेसाठी पुन्हा अर्ज केला आणि UPSC 2018 साली AIR 12 रँक मिळवली. त्यानंतर तिचा आणि तिच्या घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

काका सुरेश जैन म्हणाले, 'ती हुशार आहे आणि ती एक दिवस नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होईल हे आम्हाला माहीत होते. ती अभ्यास करण्यासाठी 350-400 किलोमीटर अंतरावर अभ्यासासाठी जायची आणि तिने खूप मेहनत घेतली, तिने आपली शिकण्याची इच्छा कधीही कमी होऊ दिली नाही.'

नम्रता जैन हिने तिच्या यशामागची गुरुकिल्ली सांगितली

तिने सांगितले की, उमेदवार आर्थिकदृष्ट्या भक्कम असेल, तर त्याने नोकरीपेक्षा केवळ तयारीवर भर द्यावा. तिच्या मते, पूर्णपणे समर्पित राहून या परीक्षेत यश मिळते. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसेल तर नोकरीबरोबरच यूपीएससी परीक्षेची तयारी करून यश मिळवता येते, असा विश्वासही तिचा आहे. ज्याच्या बळावर ती आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे.

Read More