Marathi News> भारत
Advertisement

IAS टीना डाबी-प्रदीप गावंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर 7 जन्माचं वचन

IAS टीना डाबी यांच्या लग्नाचा पहिला फोटोसमोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला साक्षीने 7 जन्माचं वचन

IAS टीना डाबी-प्रदीप गावंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर 7 जन्माचं वचन

मुंबई : IAS अधिकारी टीना डाबी यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोडळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीना डाबी या 2016 च्या UPSC टॉपर आहेत. प्रदीप गावंडे यांच्यासोबत जयपूरमध्ये त्यांनी सात जन्माची लग्नगाठ बांधली.

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी खास मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्षी मानून 7 जन्मासाठी वचनं घेतली.

जयपूरच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर रिसेप्शन पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नव्या आयुष्यासाठी युजर्सनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी टीना डाबी यांनी अतहर आमीरसोबत निकाह केला होता. मात्र लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांनी दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. IAS अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत नव्यानं टीना यांनी आयुष्य़ाची सुरुवात केली. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातून नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.  

Read More