Marathi News> भारत
Advertisement

पालिकेच्या खासगी कंत्राटदारांवर छापे, ७३५ कोटींचा घोटाळा

 यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला 

पालिकेच्या खासगी कंत्राटदारांवर छापे, ७३५ कोटींचा घोटाळा

मुंबई : मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून भाजपाचा पाठिंबा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेना आता एनडीएन सरकारमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे अधिकृत जाहीर केले नसले तरी युती तुटल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुंबईत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत मुंबई महानगर पालिकेतील कोट्यावधीचा गैरव्यवहार उघड झाला आहे. आयकर विभागाने खासगी कंत्राटदारांच्या कंपन्यांवर छापे मारले आहेत. यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. 

मुंबई आणि सूरतमध्ये सहा नोव्हेंबर पासून कंत्राटदारांवर ही कारवाई सुरु असून आतापर्यंत ४४ जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याचे आयकर विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

या कंत्राटदारांमुळे पालिकेत कोणाला फायदा होत असेल ? किंवा झाला असेल ? याची माहिती आयकर विभाग घेणार आहे. सध्या ३७ कंत्राटदारांवर ही कारवाई झाली असली तरी सध्या आयकर विभागाची कारवाई सुरुच आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याचे समोर येऊ शकते. 
 

Read More