Marathi News> भारत
Advertisement

महिलांसाठी खुशखबर, सिलेंडर बुकिंगवर आता 2700 रुपयांचा फायदा

एलपीजी बुकिंगवर सध्या मोठी ऑफर सुरु आहे. LPG च्या वाढत्या किंमतींमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

महिलांसाठी खुशखबर, सिलेंडर बुकिंगवर आता 2700 रुपयांचा फायदा

मुंबई: एलपीजी बुकिंगवर सध्या मोठी ऑफर सुरु आहे. LPG च्या वाढत्या किंमतींमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही खूप स्वस्त दरात एलपीजी सिलेंडर बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑफर आणि नफा सुद्धा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त PAYTM द्वारे गॅस बुक करावा लागणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घेऊयात.

LPG बुकिंगवर मोठी ऑफर सुरु

जर तुम्ही पेटीएमद्वारे एलपीजी सिलेंडर बुक केला तर तुम्हाला 2,700 रुपयांचा थेट लाभ मिळेल. वास्तविक पेटीएमने एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक आणि इतर अनेक वस्तूंवर सूट देखील मिळणार आहे. पेटीएमने 3 पे 2700 कॅशबॅक ऑफर नावाची योजना सुरू केली आहे. 
नवीन वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. ज्यात त्यांना सलग 3 महिन्यांच्या पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत खात्रीशीर कॅशबॅक मिळेल.

900 रुपयांपर्यंत कॅशबॅक

या ऑफरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, हा कॅशबॅक फक्त त्या ग्राहकांना उपलब्ध होईल ज्यांनी पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक केले आहेत. दरमहा 3 गॅस सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक 3 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. हा कॅशबॅक 10 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत असू शकतो.

मोठ-मोठ्या ऑफर्स सुरु

या व्यतिरिक्त, पेटीएम विद्यमान वापरकर्त्यांना प्रत्येक बुकिंगवर निश्चित बक्षीस आणि 5000 पर्यंत कॅशबॅक पॉईंट देखील ऑफर करेल. जे उत्कृष्ट ब्रॅण्ड्सकडून गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात. पेटीएमनेही काही काळापूर्वी आपल्या अॅपमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे. ज्यामध्ये यूजर्स सिलिंडरची बुकिंग केल्यानंतर त्याच्या डिलिव्हरीचा मागोवा घेऊ शकतात. याशिवाय फोनवर सिलेंडर भरण्याची रिमाइंडर देखील येईल.

 3 पे 2700 कॅशबॅक ऑफर 

इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलिंडरच्या बुकिंगवर लागू आहे. ग्राहकांना 'पेटीएम नाऊ पे लेटर' या उपक्रमात 'पेटीएम पोस्टपेड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोंदणीद्वारे पुढील महिन्यात सिलेंडर बुकिंगचे पेमेंट करण्याची संधी मिळेल.

कॅशबॅक कसा मिळवायचा?

यासाठी तुम्ही प्रथम पेटीएम अॅप डाउनलोड करा. त्यानंतर सिलिंडर बुकिंगला जा. मग तुमची गॅस एजन्सी निवडा. यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे 3 पर्याय दिसतील.यानंतर तुमचा नोंदणीकृत क्रमांक किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाका. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही प्रोसीडचे बटण दाबून पेमेंट करू शकता.

Read More