Marathi News> भारत
Advertisement

Holi Special Recipe: होळी स्पेशल थंडाई बनवा घरच्या घरी; सोप्पी रेसिपी जाणून घ्या

Holi Special Food Recipe : होळीचा रंग आणि भंग दोन्ही असतील तर मज्जाच काही और असते असं म्हणतात, घरच्या घरी थंडाई बनवणं वाटतं तितकं अवघड नाहीये , अगदी सोप्या पद्धतीने अवघ्या ५ मिनिटात तुम्ही थंडगार थंडाई बनवू शकता.

Holi Special Recipe: होळी स्पेशल थंडाई बनवा घरच्या घरी; सोप्पी रेसिपी जाणून घ्या

होळीमध्ये जसा पुरणपोळीचा मान मोठा असतो त्याचप्रमाणे धुळवड खेळताना थंडाईचा आस्वाद घेत रंगाची उधळण करणं सर्वांनाच आवडतं. होळीच्या दिवशी बाजारात मिठाईच्या दुकानात स्पेशल थंडाई (Holi Special Food Recipe) विकत मिळतेच मात्र विकतच्या पदार्थांमध्ये भेसळ असते हे आपण जाणतोच. त्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने हे हानिकारक आहे.  त्यामुळे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत थंडाई (Holi Special Food Recipe) कशी बनवायची याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊया.  (How to make thandai at home for holi 2023 recipe in marathi)

थंडाई बनवण्यासाठीचं साहित्य  (Thandai इन्ग्रेडिएंट्स)

  • बडीशेप 
  • बदाम 
  • पिस्ता
  • काजू
  • हिरवी वेलची 
  • खसखस 
  • सुकवलेल्या गुलाब पाकळ्या
  • साखर 
  • काळी मिरी
  • थंड दूध 
  • पाणी 
  • केशर 

आणखी वाचा : Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

कृती 

  • एक मोठा चमचा बडीशेप , पाच ते सहा बदाम , एक चमचा खरबुजाची बिया, ३-४ हिरवी वेलची, एक चमचा खसखस, एक चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, काळी मिरी, ७-८ पिस्ता, काजू हे सर्व एकत्र एका भांड्यात भिजत ठेवा. जवळपास ४ तास हे मिश्रण भिजू द्या. 
  • या मध्ये भिजवताना तुम्ही केसर घालू शकता.
  • आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा 

आणखी वाचा : Holi 2023 Special Recipe: : पुरणपोळीसाठी पुरण बनवताना खूप पातळ होतं का ? परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची जाणून घ्या

  • आता एक स्वच्छ आणि सुती कापड घ्या त्यातून हे मिश्रण गाळून घ्या
  • आता एका वेगळ्या भांड्यात तापवून थंड केलेलं दूध घ्या, त्यात साखर घाला आणि तयार केलेलं गाळून घेतलेलं मिश्रण घाला. पुन्हा एकदा हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्या. 

(video credit : hebbers kitchen youtube)

थंडगार होळी स्पेशल थंडाई बनून तयार आहे. वरून ड्रायफ्रूटचे काप घालून सर्व्ह करा आणि होळीचा आनंद घ्या.  (How to make thandai at home for holi 2023 recipe in marathi)

Read More