Marathi News> भारत
Advertisement

Duplicate ration card : रेशन कार्ड हरवलंय? चिंता करु नका.. इतक्या सोप्या पद्धतीनं बनवा ड्युप्लिकेट कार्ड

विचारही केला जात नाहीये ना? हरकत नाही... फार चिंता करु नका.

Duplicate ration card : रेशन कार्ड हरवलंय? चिंता करु नका.. इतक्या सोप्या पद्धतीनं बनवा ड्युप्लिकेट कार्ड

मुंबई : रोजच्या धकाधकीच्या दिवसात काही गोष्टी आपण गमावून बसतो. नुसतं गमावत नाही, तर या गोष्टी कधी मिळतील याची शोधाशोध करताना आपल्याही नाकी नऊ येतात. त्यातही काही गोष्टी हरवल्यानंतर होणारा मनस्ताप कमाल असतो. कारण, दर तिसऱ्या शासकीय किंवा महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला याची गरज असते. ही गोष्ट म्हणजे रेशन कार्ड.

पॅन कार्ड, आधार कार्ड यांप्रमाणेच अनेक कामांसाठी रेशन कार्डही तितक्याच महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक. आईडी प्रूफ (ID Proof) म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातो. हेच रेशन कार्ड चुकीनं कुठे हरवलं तर?

विचारही केला जात नाहीये ना? हरकत नाही... फार चिंता करु नका. कारण आता कोणताही ताण न घेता तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. चला पाहुया रेशन कार्ड बनवण्याची पूर्ण प्रक्रिया Online आणि Offline.

Online Process

-ड्युप्लिकेट रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राज्याच्या अन्नुपुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर जावं लागेल. ज्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज सुरु होईल.

- इथं तुम्ही ड्युप्लिकेट रेशन कार्डच्या लिंकवर क्लिक करु शकता.

- यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म सुरु होईल. जिथं तुम्ही विचारण्यात आलेली सर्व माहिती भरु शकता.

- फॉर्ममध्ये मागण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करत ती अपलोड करा.

Offline Process

- ऑफलाईन रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जिल्हा अन्न पुरवठा आणि नियंत्रक कार्यालयात जावं लागणार आहे.

- यासाठी तुमच्या कुटुंबीयांचे दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असतील.

- याच कार्यालयात तुम्हाला ड्युप्लिकेच रेशन कार्डसाठीचे फोटो मिळतील.

- फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला याममध्ये महत्त्वाची माहिती भरणं गरजेचं असेल.

- फॉर्म भरल्यानंतर तुम्ही डेपो होल्डर रिपोर्ट, पेनल्टी फीसच्या पावतीशिवाय  कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे फोटो जोडावे लागतील.

- पडताळणीच्या पायरीनंतर तुम्हाला याची माहिती देण्यात येईल आणि इथं तुम्हाला ड्युप्लिकेट रेशन कार्ड मिळेल.

 

 

Read More